''ST विलनीकरणाचा निर्णय जाहीर करा, सत्कार करतो तुमचा'' | Pravin Darekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''ST विलनीकरणाचा निर्णय जाहीर करा, सत्कार करतो तुमचा''

''ST विलनीकरणाचा निर्णय जाहीर करा, सत्कार करतो तुमचा''

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : ‘‘मी एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील एसटीमध्ये वाहक होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मला माहिती आहेत. मंत्रालयातील चालकाला ७० हजार पगार आहे. मात्र डोंगरावर एसटी घेऊन जाणाऱ्या चालकाला मात्र कमी पगार आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक तातडीने करणे गरजेचे आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर आहे." राज्य सरकारने तातडीने राज्य परिवहन महामंडळाच्या विलीनीकरणाचा निर्णय घ्यावा. त्यांनी हा निर्णय घेतल्यास आपण सरकारचा सत्कार करू, असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले.

एसटी कर्मचारी काय लहान बाळ नाही.
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागू अकरा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाला दरेकर यांनी भेट दिली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर आगारात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. दरेकर म्हणाले,
भाजप एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भडकावत असल्याचा आरोप सरकारकडून केला जात आहे. एसटी कर्मचारी काय लहान बाळ नाही. त्यांना त्यांच्या प्रश्‍नांची समज आहे. प्रश्‍नांची सोडवणूक होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी करो या मरोची लढाई उभारलेली आहे. परंतु सरकार त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.
टोलमध्ये सवलत व डिझेलमध्ये सबसीडी देण्याची गरज आहे. मात्र सरकारला काहीच करायचे नाही. फक्त आंदोलन चिरडून टाकू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. वेतन आयोगाने लागू केलेल्या शिफारशी जरी लागू केल्या, तरी प्रश्‍न सुटेल. आम्हाला फक्त पगारवाढ महत्त्वाची आहे. पगार वाढ झाली तरी हा प्रश्‍न सुटू शकतो, असे दरेकर म्हणाले.

हेही वाचा: अहमदनगर : शिक्षकाकडून रुग्णालयात परिचारिकेचा विनयभंग
परिवहनमंत्री असंवेदनशिल
राज्यात आतापर्यंत एकूण ३९ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप परिवहनमंत्र्यांनी भेट देऊन त्यांचे दुःख समजून घेतलेले नाही. त्यावरून परिवहनमंत्र्यांची असंवेदनशिलता दिसून येते, अशी टीका यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली.

हेही वाचा: २१ नोव्हेंबरपर्यंत हरकती दाखल करा ; प्राजक्त तनपुरे

loading image
go to top