महसुलमंत्र्यांचे संगमनेर होणार ‘सोलर सिटी’

आनंद गायकवाड
Wednesday, 11 November 2020

नगर जिल्ह्यात आर्थिक दृष्ट्या संपन्न व प्रगतशील असणार्‍या संगमनेर शहरात, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या वतीने मोकळ्या जागेत सौर पॅनल बसविण्यात येणार आहे..

संगमनेर (अहमदनगर) : नगर जिल्ह्यात आर्थिक दृष्ट्या संपन्न व प्रगतशील असणार्‍या संगमनेर शहरात, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या वतीने मोकळ्या जागेत सौर पॅनल बसविण्यात येणार आहे. घरगुती सौर पॅनल वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहित करून संपूर्ण शहर सोलर सिटी बनवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
त्या म्हणाल्या, संगमनेरमध्ये ग्रीन सिटी, क्लीन सिटी अंतर्गत सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग राहिला आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न बाजारपेठ, प्रगतशील शहर म्हणून संगमनेरचा राज्यात लौकिक निर्माण झाला आहे.

नगरपरिषदेने अपारंपारिक ऊर्जेला प्रोत्साहन देत नागरिकांच्या विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी सौर ऊर्जा पॅनल माध्यमातून ऊर्जा निर्मिती करण्याचे काम हाती घेतले आहे. या अंतर्गत नगरपालिकेच्या ताब्यात असणार्‍या मोकळ्या जागेवर सौर पॅनल उभारण्यात येणार असून त्यातून सौरदिवे लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या खासगी वापरासाठी घरावर कमी खर्चात सौरउर्जा पॅनलची उभारणी करावी. यातून निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे पैशांची बचत होणार असून, प्रदूषण विरहित अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे. 

हेही वाचा : Success story : नोकरी सोडून उंबरीबाळापूरमधील युवकाने केला शेतीत यशस्वी प्रयोग
भारतात मुबलक उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचा घरगुती उर्जा निर्मीतीसाठी वापर करण्याची अभिनव संकल्पना शहरात राबविण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या सौर पॅनलसाठी घरगुती ग्राहकांना साधारण 25 हजार रुपये खर्च येणार असून, यासाठी मर्चंट बॅक नागरिकांना अर्थसहाय्य करणार आहे. या माध्यमातून कायमची ऊर्जा समस्या सुटू शकणार असल्याने, या सौर ऊर्जा अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन उपनगराध्यक्ष सुमित्रा दिडडी, सर्व नगरसेवक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar news update Solar City will be the confluence of revenue ministers