nagar urban bank scam bank bachao samiti ahmednagar marathi news
nagar urban bank scam bank bachao samiti ahmednagar marathi newsSakal

Ahmednagar News : गैरव्यवहार झाकण्यासाठी ‘अर्बन’चा बळी

बॅंक बचाव समितीचा आरोप; पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करणार

अहमदनगर : नगर अर्बन बॅंक ११३ वर्षांपूर्वी स्थापन झाली. ती वाढविण्यात अनेक दिग्गजांनी प्रयत्न केले; परंतु गेल्या काही वर्षांत संचालक मंडळाने गैरव्यवहार केले. ते झाकण्यासाठी बॅंकेचा जाणीवपूर्वक बळी दिला, ती बंद पाडली, असा आरोप बॅंक बचाव कृती समितीने केला आहे.

रिझर्व्ह बॅंकेने नगर अर्बन बॅंकेची मान्यता रद्द केल्यानंतर आज बॅंक कृती समितीचे राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, ॲड. अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, ॲड. सागर गुंजाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बॅंकेच्या स्थितीबाबत माहिती दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी रिझर्व्ह बॅंकेने कोणत्या मुद्द्यावर बॅंकेची मान्यता रद्द केली, त्याबद्दल विश्लेषण केले. ते म्हणाले, की २०२१ च्या दरम्यान रिझर्व्ह बॅंकेने अर्बन बॅंकेच्या व्यवहारातील तृटी लक्षात आणून दिल्या होत्या.

मात्र प्रत्यक्ष कारवाई झालेली दिसत नाही. बॅंक बंद करण्याचे कारण देताना अनेक मुद्द्यांचा समावेश असलेले पत्र दिले आहे. त्यात संचालक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. ठेवीदारांच्या सर्व ठेवी सुरक्षितपणे मिळाव्यात.

तसेच बॅंक पुनरुज्जीवित व्हावी, असा आमचा प्रयत्न असल्याचे कृती समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आरोप असलेल्या संचालक मंडळाचे नेते सुवेंद्र गांधी प्रतिक्रिया देताना म्हणाले, की पाच लाखांच्या आतील अंदाजे २९४ कोटी रुपयांच्या ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या आहेत. पाच

‘त्यांनी’ दिशाबूल करू नये

लाखावरील ३२० कोटी रुपयांच्या ठेवीदारांच्या ५५ टक्के रकमा मागील दोन वर्षाच्या काळामध्ये आम्ही शाश्वत करू शकलो. बॅंक बंद पडण्यास विरोधकांकडून होत असलेली दिशाभूल कारणीभूत आहे. त्यांनी विनाकारण आरोप करून ठेविदारांना घाबरून सोडू नये. विरोधकांमुळेच बॅंक बंद पडली, असा आरोप संचालक मंडळाचे नेते सुवेंद्र गांधी यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.

अवसायक नियुक्तीला स्थगिती मिळावी

नगर अर्बन बॅंकेवर अवसायकाच्या नियुक्तीला काही काळासाठी स्थगिती मिळावी, अशी विनंती नगर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष अशोक कटारिया, संचालक ईश्वर बोरा, गिरीश लाहोटी यांनी दिल्ली येथील केंद्रीय निबंधकांना नुकतेच मेलद्वारे केली आहे. आम्हाला अपिलिय प्राधिकरण, अतिरिक्त सचिव, वित्तीय सेवा विभाग यांच्याकडे अपील करण्यासाठी काही काळ ही नियुक्ती स्थगित ठेवावी, असे त्यांनी म्हटले आहे.

nagar urban bank scam bank bachao samiti ahmednagar marathi news
Ahmednagar : आरोग्य व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा; बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

कर्जवसुलीसाठी विरोधक कधीही कोणाकडे गेले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले नाहीत. आम्ही मोठी कर्ज वसुली केली. अडचणीतही कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत दिले. बॅंक पुनरुज्जीवित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ठेवीदारांच्या ठेवी मिळणार आहेत. कोणीही घाबरून जाऊ नये. विरोधकांनी आरोप करून दिशाभूल करू नये.

- सुवेंद्र गांधी, सभासद व सहकार पॅनेलचे नेते

२००० पासून देशातील सुमारे ७०० बॅंका बंद पडल्या. पुनर्जीवित करण्याचा काहींनी प्रयत्न केला; परंतु त्यात यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे नगर अर्बन बॅंक पुनरुज्जीवित होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. बॅंक वाचविण्याचा आमचा प्रयत्न असेल.

- राजेंद्र गांधी, बॅंक बचाव कृति समिती

nagar urban bank scam bank bachao samiti ahmednagar marathi news
Ahmednagar News : सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमिनी मोजणीसाठी आलेले अधिकारी माघारी...

असा आहे आरोप

  • सहकार खात्याचे नियंत्रण संपुष्टात आणण्यासाठी मल्टिस्टेटचा दर्जा घेतला

  • बोगस कर्ज करून २०० कोटींचा गैरव्यवहार

  • बॅंक बंद पडल्यामुळे पाच लाखांवरील ठेवींचे भवितव्य अधांतरी

  • शंभर वर्षांत कमावलेल्या इमारती विकून पैसे देण्याची भाषा

  • वसुलीसाठी तत्कालीन संचालकांकडून प्रयत्नात तृटी

  • बॅंकेचा परवाना रद्द होण्यामागे नियोजनबद्ध कटाचाच भाग

रिझर्व्ह बॅंकेने नमूद केलेले मुद्दे

  • रिझर्व्ह बॅंकेने बरखास्त केलेले संचालक पुन्हा सत्तेत येणे

  • नोटिसा देऊनही कामकाजात सुधारणा नसणे

  • कर्ज वसुलीसाठी प्रयत्न नसल्याने एनपीए ९७ टक्के

  • बॅंकेच्या ५७.३२ टक्के खातेदारांचे केवायसी अपूर्ण

  • २०२०-२१ मध्ये झालेल्या फॉरेन्सिक आॅडिटमध्ये आठ मोठे कर्ज बोगस

  • बॅंकेचे ४५६ बोगस कर्जखाती आढळली

सद्यःस्थिती

  • ४ आॅक्टोबर २०२३ रोजी बॅंकेचा परवाना रद्द

  • सध्या सर्व कामकाज पूर्णपणे बंद

  • ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी डिपॉझिट गॅरंटी कार्पोरेशनमार्फत परत मिळणार

  • सुमारे ९५ टक्के ठेवीदारांचे पैसे मिळणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com