साईदरबारात पडद्यामागच्या मंडळींना मानाचे पान 

The nature of Gurupournima celebrations changed
The nature of Gurupournima celebrations changed

शिर्डी : शतकी परंपरा असलेल्या येथील गुरुपौर्णिमा उत्सवाचे स्वरूप लॉकडाउनमुळे बरेच बदलले. काल-परवापर्यंत उत्सवकाळात भाविकांच्या गर्दीला रोखत नेते-अभिनेते आणि विश्‍वस्त मंडळी मिरवून घ्यायची. लॉकडाउनमुळे भाविकांची गर्दी संपली. उत्सवाची शोभा कमी झाली. मिरवून घेणारी मंडळी लुप्त झाली. उत्सवातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जागा रक्तदान शिबिराने घेतली. कोरोनायोद्धे आणि साईसमाधीची नित्य देखभाल करणारे पुजारी व कर्मचाऱ्यांचे महत्त्व वाढले. लॉकडाउनमुळे ही किमया घडली. पडद्यामागची मंडळी पुढे आणि मिरवून घेणारी मंडळी पडद्याआड गेली. 

उत्सवाच्या 112 वर्षांच्या कालखंडात साईमंदिरातील नित्याच्या कार्यक्रमांत बरेच बदल झाले. पूर्वी बाबांच्या नित्य आरतीला किमान कर्मचाऱ्यांनी तरी उपस्थित राहावे, यासाठी कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश काढावा लागे. काळाच्या ओघात भाविकांची गर्दी वाढली. कर्मचाऱ्यांवरची सक्ती दूर झाली. आरतीची मागणी एवढी वाढली, की तिकीट काढून भाविक आरत्यांना हजेरी लावू लागले. उत्सव आणि गर्दीच्या काळात तर अधिकारपदाचा वापर करून मिरवून घेणारे नेते आणि प्रकाशझोतात राहणारे अभिनेते, यांचा मान ठेवण्यासाठी पाद्यपूजा आणि छोटी आरती, या नव्या प्रकाराला महत्त्व आले. 

हेही वाचा या सालगड्याचा मुलगा असा झाला मंत्री... आता देह झाला चंदनाचा 

मुळात साईसमाधीजवळ अलीकडच्या काळात पादुका स्थापित करण्यात आल्या. तेव्हापासून पाद्यपूजा हा प्रकार रूढ झाला. त्याआधी पादुका आणि पाद्यपूजा असा प्रकार नव्हता. प्रकाशझोतातील मंडळींसाठी या छोट्या आरतीच्या छोटेखानी सोहळ्यात संस्थानाचे वरिष्ठ अधिकारी सहकुटुंब- सहपरिवार मिरवून घेऊ लागले. दर्शनबारी बंद ठेवून छोटी आरती आणि पाद्यपूजेची नवी पद्धत सुरू झाली. साईमंदिरातील एका खोलीचे रूपांतर स्वागत कक्षात झाले. बाबांच्या समाधीवरील तीर्थ, चंदनाचा टिळा आणि खांद्यावर शाल टाकून मिरवणाऱ्या मानकऱ्यांचे स्वागत केले जाऊ लागले. 

साईदरबार सुना सुना 
लॉकडाउनमुळे मिरवून घेणाऱ्यांची संधी हिरावली गेली. सामान्य भाविकांची वाट अडली. भाविकांविना सुन्या सुन्या पडलेल्या साईदरबारात आजच्या उत्सवात कोरोनायोद्‌ध्यांना साईचरित्र पारायण सोहळ्याला बसण्याचा मान मिळाला. साईसमाधीची नित्य देखभाल करणाऱ्या पुजाऱ्यांना पाद्यपूजेचा मान मिळाला. लॉकडाउनमुळे साईमंदिरातील मानकरी बदलण्याची किमया घडली.  अहमदनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com