नीलेश लंकेंनी घेतली ST कर्मचाऱ्यांची भेट | MSRTC STRIKE | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Nilesh Lanke

आमदारकीपेक्षा गरीबांच्या सेवेत आनंद : नीलेश लंके

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवापारनेर (जि. अहमदनगर) : महाविकास आघाडी सरकार निश्‍चित न्याय देईल, फक्त थोडा धिर धरा. मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. मला आमदारकीपेक्षा गोरगरीबांच्या सेवेत खरा आनंद मिळतो. सर्व समस्या सरकार दरबारी मांडल्या आहेत. लवकरच त्यावर तोडगा निघेल, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.


आमदार लंके यांनी पारनेर आगारातील आंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्या वेळी ते कर्मचाऱ्यांबरोबर बोलत होते. कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर लंके म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्‍नात लक्ष घातले आहे. मी नुकतीच मुंबई येथे पवार यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात चर्चा केली आहे.

हेही वाचा: शहरातील विकासकामांत तडजोड नाही ; आमदार संग्राम जगताप

मी तुमच्या मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापर्यंत पोचविल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चितच न्याय देईल. आबा भोंडवे, संभाजी ठुबे, दत्ता कोरडे, सोमनाथ शहाणे, बलभिम कुबडे, कल्पना नगरे, स्वरूपा वैद्य, शितल मोरे, संगिता जाधव, सविता शिंदे, बापू शिंदे, संदीप शिंदे, राजू पठाण, संतोष ठुबे, सचिन थोरात, संजय पवार, गणेश चौधरी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील दरोडेखोरांची टोळी श्रीरामपूरात गजाआड

loading image
go to top