

Crackdown on Food Adulteration to Continue; No Transfer for FDA Chief Tukaram Mundhe
sakal
टाकळी ढोकेश्वर: राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट दुग्धजन्य पदार्थ, गुटखा व तंबाखूविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. विधानसभेत आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुंढे यांच्या बदलीचा कोणताही प्रश्न उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले.