फोन-पेवरून एका झटक्यात गेले ३३ हजार, दादांच्या सभेत मारलं होतं पाकिट

The number of hackers is increasing day by day
The number of hackers is increasing day by day

राहुरी (अहमदनगर) : झटपट पैशांचा व्यवहार करण्यासाठी मोबाईलवरील खाजगी ॲप्सचा वापर धोकादायक बनत चालला आहे. छोटीशी चूक खिशाला भगदाड पाडण्यासाठी पुरेशी ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायद्याबरोबर तोटाही वाढत आहे. हॅकर्सच्या जाळ्यात अडकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. असाच प्रकार पिंप्री अवघड (ता. राहुरी) येथील एका शेतकऱ्याबरोबर घडला. मंगळवारी हॅकरने त्यांना फोन-पे वरुन तब्बल ३३ हजारांचा गंडा घातला. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
    
नामदेव ठकसेन दोंड (रा. पिंप्री अवघड, ता. राहुरी) असे लूट झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी बुधवारी नगर येथे सायबर क्राईम विभागात तक्रार अर्ज दाखल केला.

अधिक माहिती अशी : ३० जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार राहुरीच्या दौऱ्यावर आले होते. शेतकरी नामदेव दोंड सभेसाठी उपस्थित होते. त्यांच्या खिशातील पाकीटाची चोरी झाली. त्यात, तीन हजार रुपये रोख रक्कम व महाराष्ट्र बँकेच्या एटीएम कार्डची चोरी झाली. त्यामुळे मोबाईल वरील गुगलचा फोन-पे ॲपचा वापर बंद झाला. त्यांनी बँकेकडून नवीन एटीएम कार्ड घेतले. परंतु, फोन-पे ॲपवर नवीन एटीएम कार्ड चालत नव्हते. त्यांनी ॲप अन्इंस्टॉल करुन पुन्हा नव्याने डाऊनलोड करून घेतले. तरी, त्यावर नवीन एटीएम कार्ड चालेना.

मंगळवारी त्यांनी गुगल वरून फोन-पे ॲपच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला. १८००४१२००९९० नंबरवर संपर्क साधला. थोड्या वेळाने त्यांना +९१९०६४००३१३५ नंबर वरून फोन आला. त्यांना फोन-पे सुरु करण्यास सांगितले. फोन-पे च्या कस्टमर केअरचा फोन समजून, त्यांनी समोरच्याने सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले. क्षणार्धात त्यांना बँकेचा मेसेज आला. खात्यावरून ३३ हजार रुपये वर्ग झाले. तसे त्यांचे डोळे खाडकन उघडले. आपण हॅकरच्या जाळ्यात अलगद फसल्याचे लक्षात आले. मंगळवारी रात्री त्यांनी नगरचे सायबर क्राईम गाठले. बँकेचे खाते तात्पुरते गोठविले. बुधवारी महाराष्ट्र बँकेच्या राहुरी शाखेतून खाते उतारा घेऊन, सायबर क्राईमला रितसर तक्रार दिली. 

मोबाईलच्या खासगी ॲपद्वारे हॅकरने बँकेच्या खातेदाराला लुटण्याचा प्रकार महिन्या-पंधरा दिवसातून एकदा हमखास घडत आहे. बँकेतर्फे खातेदारांना एसएमएस द्वारे काळजी घेण्याच्या सूचना वारंवार पाठविल्या जातात. परंतु, खातेदारांची छोटी चूक घोडचूक ठरते. खातेदारांनी मोबाईल ॲप्सचा वापर करतांना सावधानता बाळगावी. 
- मनोजकुमार यादव, शाखाधिकारी, महाराष्ट्र बँक, राहुरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com