गावापासून पाच किलोमीटरवर वाकड डोंगरावर भरतेय ऑनलाइन शाळा

An online school on Wakad hill five kilometers from the village
An online school on Wakad hill five kilometers from the village

अकोले (अहमदनगर) : रोज सकाळी उठून पाच किलोमीटर वाकड डोंगरावर जाऊन ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी आदिवासी अतिदुर्गम भाग असलेल्या कुमशेत येथील विद्यार्थ्यांची धडपड सुरु आहे.

धुके, वारा, पाऊस याची पर्वा न करता व पालकांकडून महागडे अँड्रॉइड मोबाईल घेऊन व पालक कर्ज, उसने पैसे घेऊन मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून अडचणीवर मात करून ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा स्वीकार करत आहेत. पण, जिथे विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, चार तास प्रयत्न करून झाल्यावर अर्धा तास रेंज येते व त्यावेळात हि मुले अभ्यास करतात. वस्तू स्थिती आहे अकोले तालुक्यातील अदिवासी भागात.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सर्व कॉलेज, शाळा बंद असल्याने सरकारने व शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण सुरु केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला अँड्रॉइड मोबाईल घेणे आवश्यक नाही. त्यात आदिवासी दुर्गम भागातील जनतेला रोजगार नाही. खावटी नाही, शेतीला बियाणे खते उपलब्धतेसाठी मागील वर्षी जे काही उत्पन्न मिळाले त्यातून तर काही शेतकऱ्यांनी उसने पैसे घेऊन आपल्या शेतात बी पेरले. त्यात अस्मानी संकट. पिकावर पडलेली कीड यामुळे या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात मोबाईलचे संकटामुळे मुले हट्टाला पेटली. 

मोबाईल नाही तर शिक्षण नाही त्यातून वाट काढत गरीब आदिवासींनी आपल्या घरात साठवलेले तांदूळ विकून व काही पैसे ठेवून १० हजाराचे मोबाईल मुलांना घेऊन दिले. कुमशेतमध्ये रेंज नसल्याने हि मुले रोज भाकरी बांधून वाकड डोंगरावर पाच किलोमीटर पायी जाऊन दगडाचे मचाण करून जिथे रेंज आहे त्या ठिकाणी बसतात. 

हेही वाचा : खासगी शाळांचे पेव फुटल्याने सरकारी शाळा दुर्लक्षीत होण्याची शक्यता
आपल्या शिक्षकांशी सवांद साधून अभ्यासाचे धडे गिरवतात. मात्र नेटवर्किंग व्यवस्थित होत नसल्याने चार तासात केवळ अर्धा ते पाऊणतास त्याचा अभ्यास होतो. त्यात मध्येच धुके व पाऊस आला की रेंज जाते. पाऊस आला की जवळच असलेल्या दगडाच्या गढीत बसतात. पाऊस गेला की पुन्हा यांची जिथे रेंज मिळते त्या ठिकाणी जाऊन अभ्यास सुरु होतो. असा ऊन सावलीचा खेळ करत मुले ऑनलाईन शिक्षण घेतात. तर काही मुले वडिलांना मदत व्हावी म्हणून गुरे, शेळ्या घेऊन जातात. गुरे शेळ्या एका डोंगरावर व मुले दुसऱ्या डोंगरावर. 

ही मुले करतात डोंगरावर अभ्यास
नितीन अस्वले, एसवायबीए (पुणे विद्यापीठ), मनीषा सयाजी अस्वले, एसवायबीए (अकोले कॉलेज), सविता अस्वले, टीवायबीए (राजूर, कॉलेज), स्वाती अस्वले, १० वी (मवेशी), गोपाळ अस्वले, एफवाय (प्रवरानगर), ज्योती अस्वले, टीवायबीए (संगमनेर), कृष्णकांत अस्वले, १२ वी (लोणी). 

नितीन अस्वले : ऑनलाईनमुळे वडिलांनी १२ हजाराचा मोबाईल घेऊन दिला. गावात रेंज नसल्याने वाकड डोंगरावर येतो. मात्र रेंज पाऊस व धुके असल्याने धरसोड करते दिवसभरात एक तासच अभ्यास होतो.

सयाजी अस्वले (सरपंच कुमशेत) : सरकारने शिक्षण पद्धतीत बदल केला मात्र आदिवासी भागातील शेतकरी , मजूर यांचा रोजगार नाही हाताला काम नाही पोटाला घास नाही मग महागडे मोबाईल घेऊन खायचे काय नि जगायचे कसे असा प्रश्न पालकांसमोर आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com