

Rahata Elections Disrupted as EVM Error Surfaces During Verification
Sakal
राहाता : पालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मतदानासाठी निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यापूर्वी ईव्हीएम मशिनची पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्यात पाच मशिनमध्ये बिघाड आढळला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याऐवजी दुसऱ्या मशिन कर्मचाऱ्यांना दिल्या. त्याबाबत उमेदवारांना कळवून कागदावर त्यांच्या सह्या घेण्याची प्रक्रिया सुरू होताच बरेच उमेदवार संतप्त झाले.