सबके साथ विश्वासघात ! इंधन, गॅस दरवाढीविरोधात युवक कॉंग्रेसचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

सर्वसामान्य जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल सह सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या स्वयंपाकाच्या गॅसची भरमसाठ दरवाढ केली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : पेट्रोल-डिझेल, तसेच गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक कॉंग्रेसतर्फे दिल्ली नाका येथे युवक कॉंग्रेस, एनएसयूआय यांच्यातर्फे केंद्र सरकारविरोधात विश्वासघात आंदोलन करण्यात आले. 'सबके साथ विश्‍वासघात'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

सर्वसामान्य जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल सह सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या स्वयंपाकाच्या गॅसची भरमसाठ दरवाढ केली आहे. याचा तीव्र निषेध देशातील जनता करीत असून, या सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याची टीका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली. संगमनेरात युवक कॉंग्रेसच्यावतीने मोदी सरकारच्या विरोधात हाय, हायच्या घोषणा देत भाववाढीचा तीव्र निषेध करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने भारतीय जनतेचा विश्वासघात केला आहे. अफवा पसरवणे व खोटे बोलणे ही भाजप सरकारची सर्वात मोठी ताकद आहे. कॉंग्रेसचे सरकारच्या काळात हीच मंडळी किरकोळ भाववाढीच्या मुद्द्यावर तीव्र निदर्शने करीत होती. मागील सहा वर्षात मात्र इंधनाच्या दरात उत्तरोत्तर भरमसाठ वाढ झाली आहे. पेट्रोलच्या भावाने शंभरी पार केली आहे.

सावधान ! लग्नासाठी नवा नियम; पाळला नाहीत तर होणार कारवाई

कॉंग्रेसवर केलेल्या घोटाळ्यांचे आरोप हे सरकार सहा वर्षात एकदाही सिद्ध करू शकले नाही. याचा अर्थ कॉंग्रेसने काही घोटाळा केलाच नव्हता, मात्र भाजपाने बनवाबनवी केली आता जनतेवर भाववाढीचा बोजा लादला आहे. गोरगरिबांसाठी बुरे दिन तर केवळ भांडवलदार व श्रीमंतांचे अच्छे दिन असल्याची टीका करताना, या सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरले असल्याचा आरोपही तांबे यांनी केला. 

बाबा ओहोळ म्हणाले, कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सामान्य जनता भाजप सरकार विरोधात एकवटली आहे. भाव वाढ करून सर्वसामान्य जनतेला भाजपाने वेठीस धरले आहे. 

यावेळी युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, आनंद वर्पे, शेखर सोसे, श्रेयस कर्पे, ऋतिक राऊत, मनिष राक्षे, प्रा. बाबा खरात, गोपी जहागिरदार, लाला मुनीम खान, अक्षय दिघे, रमेश दिघे, नितीन अभंग, विजय उदावंत, शैलेश कलंत्री, नितीन सांगळे, बाळासाहेब कानवडे, सुमित वाघमारे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangamner the Youth Congress has started agitation against fuel and gas price hike