Srirampur Fraud: श्रीरामपूरमध्ये मालमत्तेच्या व्यवहारात फसवणूक; सात जणांविरुद्ध गुन्हा
Fraud in Property Deal at Shrirampur: संबंधितांनी ५ जानेवारी २०२३ रोजी खोटा व बोगस आपसमजुतीचा करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविला आहे, तसेच या व्यवहारात आरोपींनी अपूर्ण वंशावळ दाखवून, त्यांची व त्यांच्या सावत्र बहीण मीनाबाई खर्डे यांची संमती किंवा सही न घेता दस्त नोंदविला.
श्रीरामपूर: मालमत्तेच्या व्यवहारात फसवणूक व धमकावल्याप्रकरणी दीपक लक्ष्मण डावखर (रा. वॉर्ड क्र. ३, कुंभार गल्ली, श्रीरामपूर) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.