
अहिल्यानगर : आळेफाटा परिसरातील रस्त्यावर सुमारे तीन वर्षांपूर्वी एक बेघर, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुण एकटाच फिरताना दिसला. कोणतीही ओळख नसलेला, संवादास असमर्थ असलेला आणि अर्धवट कपडे असलेल्या स्थितीतील हा तरुण सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार यांच्या दृष्टीस पडला. त्यानंतर एका हरवलेल्या आयुष्याचा नव्याने उभारणीचा प्रवास सुरु झाला.