

Thackeray Group Expels Former Deputy Mayor over Alleged AB Form Theft
Esakal
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सध्या वेगवेगळी राजकीय समीकरणं बघायला मिळत आहेत. कट्टर वैरी आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले नेतेही हातमिळवणी करतायत. अशातच नाराजांची संख्याही जास्त असल्याचं दिसतंय. अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं ज्याला एबी फॉर्म दिला त्याचीच पक्षातून हकालपट्टी केलीय. उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि शहर समन्वयक भागवत लांडगे असं त्यांचं नाव आहे. पक्षानं शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर निष्ठावंत राहिलो ही आमची चूक होती का? असा प्रश्न राजेंद्र पठारे यांनी विचारलाय.