कल्याण- अहमदनगर महामार्गात वाहतूक बदल नाहीच! माळशेज घाट सुरू राहणार

कल्याण-अहमदनगर महामार्ग सुरूच राहणार
traffic
trafficEsakal

माळशेज घाट हा मुंबईतील नागरिकांना किंवा पुणे, अहमदनगर मधून जाणाऱ्या नागरिकांसाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे माळशेज घाटातून अनेक प्रवाशी ये – जा करतात. कल्याण माळशेजमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण गुरुवार दि. १९ मे ते प्रत्येक गुरुवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ हा मार्ग रस्त्याच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार होता. परंतु हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे माळशेज घाटातील वाहतूक बदल रद्द करण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील लांबी किमी ९८.६०० ते १००. २८० मध्ये दि. १९.०५.२०२३ रोजी आणि पुढील दर गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते सांयकाळी ६.०० वाजे पर्यंत रस्त्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार होते.

traffic
Karnataka CM : सिद्धरामय्या मुख्यमंत्री; डी के शिवकुमारांना मिळालं हे पद; शपथविधीचा मुहूर्त ठरला!

पर्यायी वाहतुक व्यवस्था ही कल्याण- माळशेज घाट खुबी करंजाळे खिरेश्वर ते कोल्हेवाडी- सागनोरे, पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, कोळवाडी ओतूर ते आळेफाटा- अहमदनगर असे पत्र या उपविभागाचे होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर ठिकाणाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे पुढील सुधारित सूचना येई पर्यंत महामार्ग वाहतुकीत कोणताही बदल झालेला नाही. तसेच सदरील महामार्गावर सर्व प्रकारच्या वाहनासाठी वाहतूक चालू राहतील अशी सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यतात आली आहे.

traffic
Karnataka : सिद्धरामय्यांमुळंच युती सरकार कोसळलं; सत्ता स्थापन करण्यापूर्वीच दोन बड्या नेत्यांचा मोठा गौप्यस्फोट

माळशेज घाट हा नगर, नाशिक, पुणे कडील नागरिकांना जाण्यासाठी जवळचा व सोपा मार्ग आहे. पावसाळ्याच्या अगोदर या मार्गावर रस्त्याची कामे सुरू करण्यात आली असून पावसाळा सुरू झाल्यानंतर कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न प्रशासनाचे आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी मुंबईकडे जाताना पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले होते.

नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गा क्र.६१ वरील जुन्नर तालुका हद्दीतील वाहतुकीत शुक्रवार ता.१९ पासून पर्यायी मार्गाने होणार होती तो आदेश संबधीत विभागाने काही तांत्रिक अडचणी मुळे रद्द केला असल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

या वाहतुक मार्गातील बदला रद्द बाबत बुधवारी रात्री उशीरा सहाय्यक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग मुरबाड,जि.ठाणे यांचे पत्र ओतूर पोलीसांना प्राप्त झाले आहे.त्यानुसार नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गा क्र.६१ वरील जुन्नर तालुका हद्दीतील वाहतुक शुक्रवार ता.१९ रोजी व पुढील प्रत्येक गुरुवारी सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत पर्यायी मार्गाने होणार होती ती काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली आहे. तरी सर्व वाहनचालकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com