ऑनलाइन अभ्यासाचा डोळ्यांना ताप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

कोरोना विषाणू कोविड-19 चा प्रादुर्भाव बघता मुलांसाठी ऑनलाइन अभ्यास सुरू करण्यात आला. मात्र हा ऑनलाइन अभ्यास मुलांच्या डोळ्यासाठी त्रासदायक असून, त्यासाठी पालकांनी सावध असायला हवे.

अकोला : कोरोना विषाणू कोविड-19 चा प्रादुर्भाव बघता मुलांसाठी ऑनलाइन अभ्यास सुरू करण्यात आला. मात्र हा ऑनलाइन अभ्यास मुलांच्या डोळ्यासाठी त्रासदायक असून, त्यासाठी पालकांनी सावध असायला हवे, असा इशारा वजा सल्ला नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे यांनी जागतिक दृष्टीदान दिनाच्या पार्श्‍वभूमीवर दिला.

 

जागतिक दृष्टीदान दिन हा 10 जून रोजी संपूर्ण जगात पाळला जातो. डोळ्यांबाबत जागृकता निर्माण करणे आणि नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने हा दिन पाळला जातो. जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. आर.ए. भालचंद्र यांचा स्मृतीदिन म्हणूनही भारतात हा दिवस पाळला जातो. या दिनाचे निमित्त साधून डॉ. लाहोळे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत पालकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हे आहेत धोके
- ई-लर्निंगमुळे स्क्रिनिंग टाईम वाढल्याने डोळ्यावरील ताण वाढणार आहे.
- कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) हा डोळ्याचा आजार उद्‍भवू शकतो.
- विद्यार्थ्यांसोबतच मोठ्यांनाही धोका.

 

हेही वाचा ः  अजित पवार साहेब दुजाभाव करू नका, विदर्भातील वारकऱ्यांनाही परवानगी द्या

या आजारांचा धोका
- डोळे दुखणे
- डोके दुखणे
- डोळा कोरडा होणे
- डोळ्यांना खाज सुटणे
- चिडचिडपणा वाढणे
- डोळे लाल होणे
- अंधुक दिसणे
- कधी-कधी एकच प्रतिमा दोन दिसणे

 

महत्त्वाचे ः डाॅ. मीनाक्षी गजभिये अकोल्याच्या नव्या डीन

काय करावे?
- पाच वर्षांखालील मुलांनी डिजिटल उपकरणांवर दररोज एक तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ घालवावा.
- एक ते दोन वर्षांच्या मुलांना या उपकरणाजवळ जाऊ देवू नका.
- पाच वर्षे व त्यापेक्षा मोठ्या मुलांनी योग्य ब्रेक देत मर्यादित वेळ स्क्रिनपुढे घालवावा.

पालकांना काय करावे?
-मुलांना डोळ्यांचा त्रास जाणवत असेल तर पालकांनी मुलांच्या स्क्रिन वेळेकडे लक्ष द्यावे.
- मुलं 15 ते 20 मिनिटे सलग स्क्रिनकडे बघत असेल तर त्यांनी किमान 30 सेकंदासाठी स्क्रिनवरून दृष्टी हटवावी, याकडे पालकांनी लक्ष द्यावे.
- 20 ते 25 फुटांवरील एखादे दृष्य बघावे.
- संगणकावर एंटग्लास संरक्षणात्मक स्क्रिन कव्हर लावून घ्यावे.
- स्क्रिन खूप चमकदार नसावी.
- मजकूर मोठा दिसण्यासाठी फॉन्ट बदलावा.
-स्क्रिनची पार्श्‍वभूमी बदला.
- रंगसंगती डोळ्यांना सुखद वाटणारी ठेवा.
- मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य अधिक चांगले ठेवण्यासाठी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online study harm student eyes ....Akola Marathi Health news