esakal | 11 अडत कंपन्यांना गंडा, शिवप्रकाश रुहाटिया खाजगी रूग्णालयातून फरार?
sakal

बोलून बातमी शोधा

11 अडत कंपन्यांना गंडा, शिवप्रकाश रुहाटिया खाजगी रूग्णालयातून फरार?

11 अडत कंपन्यांना गंडा, शिवप्रकाश रुहाटिया खाजगी रूग्णालयातून फरार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ११ अडत कंपन्यांच्या संचालकांना सुमारे एक कोटी ८७ लाख रुपयांचा गंडा घातल्यानंतर गुन्हे दाखल होताच पाेलिसांनी शिवकुमार रुहाटीया व शेख जावेद शेख हुसेन कादरी या दोघांना ताब्यात घेतले. शिवकुमार रुहाटीया यांना वैद्यकीय महाविद्यालयातील वाॅर्ड क्रमांक सहा येथे दाखल केल्यानंतर तेथून खासगी रुग्णालयात हलविण्याचे बनावट कागदपत्र तयार करून रूहटिया पसार झाले. यामागे वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हात असल्याने या प्रकरणाची सखेल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी ११ अडत्यांनी वैद्यकीय अधिष्ठाता डाॅ. मीनाक्षी गजभिये यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे. (11 Adat companies cheated, Shiv Prakash Ruhatia absconding from private hospital?)

हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी


नर्मदा साॅल्वेक्स कंपनीचे संचालक शिवकुमार रुहाटीया व त्यानी अधिकृत नियुक्त केलेल्या लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी या दोघांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अरिहंत ट्रेडिंग कंपनी, अजय ट्रेडर्स, सत्यजीत ट्रेडिंग, आशिर्वाद ट्रेडिंग, रोशन ट्रेडिंग, हनुमान ट्रेडिंग, मालानी ट्रेडिंग, ए एम शिंगरूप, जैन ट्रेडिंग, पुंडलिक ट्रेडर्स व मानकर ॲण्ड सन्स या ११ कंपन्यांकडून सुमारे एक काेटी ८७ लाख ७८ हजार ४९१ रुपयांचे साेयाबीन एप्रिल आणि मे महिन्यात खरेदी केले हाेते.

हेही वाचा: पहिलीच्या प्रवेशासाठी साडेपाच वर्षाची अट

त्यानंतर अडत्यांनी या साेयाबीन विक्रीचे देयक या दोन्ही कंपन्यांकडे सादर केल्यानंतर दाेन्ही कंपन्यांच्या संचालकांनी त्यांना देयकाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली.त्यामुळे अकाेल्यातील काही व्यापारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.मात्र, दाेन्ही कंपन्यांच्या संचालकांनी केवळ एक कोटी १० लाख रुपये देण्याचे कबूल केले.मात्र, हा आकडा केवळ ६० टक्केच असल्याने मध्यस्थी झाली नाही़ त्यामुळे या अडत्यांच्या वतीने सतीश जैन यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा: खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप


पाेलिसांनी गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.यामधील शिवकुमार रुहाटीया यांची प्रकृती ठीक नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने त्यास खासगीत हलविण्यासाठी कागदपत्र तयार करून दिले.त्यानंतर आराेपी आयकाॅन हाॅस्पिल येथील २०८ क्रमांकाच्या खाेलीत असल्याचे सांगण्यात आले या ठिकाणी अडत्यांनी चौकशी केली असता आरोपी दाेन्ही ठिकाणी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यामुळे आराेपीला पसार करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अडत्यांनी केली आहे़.

हेही वाचा: दोन गटातील एकूण सहा गंभीर जखमी, दोन ट्रॅक्टर नदीत फेकले

11 Adat companies cheated, Shiv Prakash Ruhatia absconding from private hospital?

loading image