45 Day Dry Spell Devastates Crops in Western Vidarbha
sakal
अकोला - पावसाने तब्बल ४५ दिवसांपासून पाठ फिरवल्याने पश्चिम विदर्भातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. सोयाबीन, मूग, उडीद आणि तूर पिके उद्ध्वस्त झाली असून कपाशीही करपण्याच्या मार्गावर आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहण्याची भीती असतानाही सरकारकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करीत उद्धवसेनेचे उपनेता, आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा बिगुल वाजणार आहे.