प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ८ कोटींची बनवेगिरी

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ८ कोटींची बनवेगिरी

अकोला ः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत (Pradhan Mantri Kisan Sanman Yojana) बनवेगिरी करुन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडून थकीत रक्कम वसुल करण्याची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे बनवेगिरी करणाऱ्यांकडून आतापर्यंत १ कोटी ८० लाखच वसुल करण्यात आले असून ८ कोटी २२ लाख रुपये वसुल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. (8 crore in Pradhan Mantri Kisan Sanman Yojana in Akola district)

केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर केंद्र शासनाने सर्वच राज्यातील बोगस लाभार्थी शोधण्याचे आदेश दिले. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ८ कोटींची बनवेगिरी
प्रेरणादायी विवाह; ठाणेदार झाले वधू पिता, विस्तार अधिकारी मामा

त्यासोबत काही शेतकऱ्यांच्या खात्यात सहा ते सात हप्ते सुद्धा जमा करण्यात आले आहेत. परंतु योजनेचा लाभ सरकारी नोकर, टॅक्स भरणाऱ्या मोठ्या व्यवसायिकांनी घेतला असून १० हजार ९२३ अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम वसुल करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन करत असून त्यांना त्यात फारसे यश मिळत नसल्याचे वास्तव आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ८ कोटींची बनवेगिरी
आजपासून वर्दळ; बाजार दुपारी दोन वाजेपर्यंत अनलॉक!


आहे आहे वसुली
बोगस लाभार्थ्यांसह टॅक्स भरणाऱ्या १० हजार ९२३ लाभार्थ्यांकडून जिल्हा प्रशासनाला ८ कोटी २२ लाख ३२ हजार रुपये वसूल करायचे आहेत. परंतु अद्याप केवळ १ कोटी ८० लाख ७४ हजार रुपयेच वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित ६ कोटी ४१ लाख ५८ हजार रुपये वसूल करण्यासाठी प्रशासनाला कस लागत आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ८ कोटींची बनवेगिरी
मूर्तिजापुरात लसीकरण केंद्रावर वाद, लसीकरण बंद


अशी आहे वसुलीची स्थिती
- वसुलीस पात्र बोगस लाभार्थी - १० हजार ९२३
- रक्कम वसुल करण्यात आलेले लाभार्थी - २ हजार ७९
- रक्कम वसुली शिल्लक लाभार्थी - ८ हजार ८४४
- वसुली शिल्लक रक्कम - ६ कोटी ४१ लाख ५८ हजार

संपादन - विवेक मेतकर

8 crore in Pradhan Mantri Kisan Sanman Yojana in Akola district

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com