अकोला-खंडवा गेज परिवर्तनासाठी ८८८ कोटी

व्याघ्र प्रकल्पाचा अडसर कधी दूर होणार? अकोटपर्यंतचे गेज परिवर्तन होऊन दीड वर्ष उलटले
888 crore for Akola Khandwa conversion Union Budget construction of railways
888 crore for Akola Khandwa conversion Union Budget construction of railwayssakal

अकोला : दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा अकोला-खंडवा-रतलाम या लोहमार्गाचे गेजपरिवर्तन करण्यासाठी सन २०२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणखी ८८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, अनेक वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लागवण्यासाठी मेळघाट वाघ्रप्रकल्पाडा अडसर कधी दूर होईल, याबाबत अद्यापही संभ्रम असल्याने हा निधी केवळ अंदाजपत्रकापुरताच मर्यादित ठरू नये, अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

888 crore for Akola Khandwa conversion Union Budget construction of railways
कॅप्टन राम लाड यांचा अल्पपरिचय

अकोट ते खंडवापर्यंतचे गेजपरिवर्तनाचे भवितव्य अधांतरीच आहे. रतलाम-महू-खंडवा-अकोला या ४७३ किलोमीटर लांबीचा मीटरगेज मार्ग ब्राॅडगेजमध्ये रुपांतरित करण्यासाठी सन २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळच्या प्रस्तावानुसार एक हजार ४७२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आता या प्रकल्पाची किंमत चार हजार कोटीवर पोहोचली आहे. गत सहा अर्थसंकल्पांमध्ये यासाठी एक ९९६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यानंतरही महाराष्ट्रातील अकोट ते खंडवा व मध्य प्रदेशातील बलवाडा ते महू दरम्यान वनविभागाची मंजुरी व जमीन अधिग्रहणामुळे हा प्रकल्प रखडलेला आहे. तब्बल ४७३ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात अकोला ते अकोटपर्यंत ४३ किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. या मर्गाची चाचणी जुलै २०२० मध्ये घेण्यात आली होती. दीड वर्ष उलटूनही या मार्गावरील मध्य प्रदेशात रतलाम ते महूपर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतरही अकोट ते अमला खुर्द आणि सनावद ते महू असे एकूण १३१ किलोमीटरचे काम रखडल्याने कोणतीही गाडी सुरू होऊ शकली नाही.

888 crore for Akola Khandwa conversion Union Budget construction of railways
विद्यार्थी त्रस्त : शाळा सुरू, वसतिगृहे बंद

राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष!

अकोट ते खंडवा लोहमार्गाचा ३८ किलोमीटरचा पट्टा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किमी लांबीचा मार्ग हा गाभा क्षेत्रातून जातो. त्यामुळे मेळघाटातून ब्राॅडगेजच्या कामाला पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारनेही या मार्गाला हिरवी झेंडी दिलेली नाही. मेळघाट ऐवजी हिवरखेड-सोनाळा-जामोद-कुंवरदेव मार्गे खंडवापर्यंत हा मार्ग नेण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

अकोटकर गाडीच्या प्रतीक्षेत

सन २००८ पासून अकोला-रतलाम मार्गावर एक ९९६ कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. त्यामध्ये पूर्णा ते अकोटपर्यंतचा मार्ग पूर्ण होऊन दीड वर्ष उलटले. पूर्णा ते अकोल्यापर्यंत दक्षिण-मध्य रेल्वेकडून विद्युतीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे. मात्र, अकोटपर्यंत गाडी सुरू करण्याच्या दृष्टीने अद्यापही कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे अकोटकरांना अद्यापही रेल्वे गाडीची प्रतीक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com