Akola : शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

रक्तदात्यांकडून रक्तदानाचे आवाहन
blood bank
blood banksakal

अकोला : स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) व सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीमध्ये गत काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आपात्कालीन, दुर्घटनाग्रस्त व गर्भवती महिलांसह सिकलसेल व थॅलिसिमीयाग्रस्त बालकांना रक्त देण्यास विलंब होत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे पश्चिम विदर्भातील मोठे व अद्यावत रुग्णालय आहे. येथे अकोला जिल्ह्यासह शेजारील वाशीम, बुलढाणा, अमरावती, जळगाव इत्यादी जिल्ह्यातून रोज अंदाजे ४०० ते ५०० रुग्ण दररोज उपचारासाठी येत असतात. त्यापैकी उपचारार्थ दाखल होणाऱ्या ४० ते ५० रुग्णांच्या दररोज लहान, मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात येतात. त्यासाठी रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते.

सद्यस्थितीत दररोज होणारे अपघात, दैनंदिन चालणाऱ्या शस्त्रक्रिया, थॅलेसिमीया व हिमोफोलियाचे मोठ्या प्रमाणावरील बाल रुग्ण, टीबीचे रुग्ण, वैद्यकीय व कायदेविषयक रुग्ण, राष्ट्रीय कार्यक्रमातील रुग्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाळंतपणात करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया दरम्यान रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते.

रुग्णालयात रुग्णांची निकड लक्षात घेवून त्यांना मोफत रक्ताचा पुरवठा सुद्धा करण्यात येतो. त्यामुळे रक्तपेढीत रक्ताची मागणी अधिक असते, परंतु सध्या या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना रक्त देताना कर्मचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लावत असून रुग्णांची सुद्धा रक्तासाठी गैसोय होत आहे. दरम्यान रुग्णांच्या सुविधेसह त्यांचे प्राण वाचवण्यासाठी जिल्ह्यातील रक्तदात्यांनी रुग्णालयात रक्तदान करण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मागणी अधिक; साठा मर्यादित

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीतून महिन्याला सुमारे १२०० रक्त पिशव्या रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येतात, तर दिवसाला सरासरी ४० रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. परंतु सध्या रक्तपेढीत रक्ताचा साठा नगण्य असल्याने व मागणी सतत होत असल्याने रक्तपेढीत कार्यरत कर्मचाऱ्यांसह इतरांना रुग्णांना रक्त देण्यास अडचणी येत आहेत.

रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांनी रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान करावे. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचवण्याचे ईश्वरीय कार्य आपल्या हातून घडू शकते.

- डॉ. मीनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

सिकलसेल ग्रस्तांना रक्तदेण्यास अडचणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीतून महिन्याला सरासरी ९६८ सिकलसेलग्रस्तांना रक्त देण्यात येते. परंतु सध्या रक्तपेढीत नगण्य रक्त उपलब्ध असल्याने सिकलसेल ग्रस्तांना सुद्धा रक्त देण्यास अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेवून रुग्णसेवेसाठी रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com