दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी!

संतोष थोरहाते
Friday, 6 November 2020

दिवाळी सणाची आतुरता व उत्साह लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत कायम असतो. दिवाळीच्या सणाच्या तयारी करीता गृहिणीवर्ग पंधरा दिवसापासून तयारीला लागतात.

हिवरा आश्रम (जि.बुलडाणा)  : दिवाळी सणाची आतुरता व उत्साह लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत कायम असतो. दिवाळीच्या सणाच्या तयारी करीता गृहिणीवर्ग पंधरा दिवसापासून तयारीला लागतात.

सद्या ग्रामीण भागातील गृहिणींची दिवाळीच्या फराळ तयारीसाठीची लगबग दिसून येत आहे. दिवाळीसाठी खमंग,चविष्ट व रूचकर फराळ तयारीत गृहिणी मग्न आहेत. मात्र यावर्षी दिवाळीच्या फराळाला महागाईच्या झळा बसत असून, यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे.

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सणासुदीवर कोरानाचे सावट दिसून आले. दिवाळी सण हा दिव्यांच्या प्रकाशज्योतीचा उत्सव,सोने चांदी,नवे कपडे खरेदीचा सण... त्यासोबतच दिवाळी विविध मिठान्नाचा मनमुराद आस्वाद घेण्याचा सण.. दिवाळीच्या नियोजनात सद्या ग्रामीण भागातील महिला मग्न असल्याचे दिसून येत आहे.

मात्र यावर्षी किराणा मालाच्या किंमत झालेल्या वाढीमुळे दिवाळीचे फराळ महागणार आहे. दिवाळीच्या फराळाला महागाईच्या झळा बसणार आहे तूर डाळ ९० वरून ११० रूपये,हरभरा दाळीच्या किंमतीत सुध्दा ६० वरून ७० रूपयाची वाढ झाली आहे.

त्यासोबत तेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे 100 रूपयाची वाढ झाली आहे. गेल्या आठवडयात किराणा मालाच्या किंमतीत चांगली वाढ झाल्याचे दिसून येते. दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे दिवाळीचे फराळ महागार असल्याचे चिन्ह दिसून येणार आहे.

दिवाळीच्या अगोदरच तेल,डाळ,रवा,बसेन,शेंगदाना,मैदा,यांच्या दरात १० रूपयाने वाढ झाली आहे. अगोदरच कोराना विषाणूमुळे जनसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली असून अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्यांना कोरोनामुळे आर्थिक संकटांना सामना द्यावा लागत असतांना त्यात परत किराणा मालाच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

त्यात दिवाळीच्या अगोदर किराणा मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ऐन दिवाळीच्या अगोदर किराणा मालाच्या दरात वाढ झाली.

ऐन दिवाळी सणाच्या अगोदर किराणा मालाच्या किंमतीत वाढ झाली.सद्या दिवाळी फराळ बनविण्याची लगबग सुरू आहे. मात्र महागाईमुळे फराळ दिवाळीच्या फराळाला महागाईची झळ बसत आहे.
- सविता शेरे, गृहिणी, हिवरा आश्रम

किराणा वस्तूच्या दरात वाढ
दिवाळी काही दिवसावर येवून ठेपली असतांना किराणा मालाच्या दरात वाढ झाली. किराणा मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे त्‍याची झळ ऐन दिवाळी सणाला बसत आहे.डाळीसह,तेल व इतर वस्तूच्या किंमती वाढ झाली आहे. याचा ग्राहकांना सोबत किराणा व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर,अकोला)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News: Inflation hits Diwali farala