मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लोणारमध्ये

Akola Buldana Political News Chief Minister Uddhav Thackeray in Lonar tomorrow
Akola Buldana Political News Chief Minister Uddhav Thackeray in Lonar tomorrow
Updated on

लोणार (जि.बुलडाणा) : वैशिष्ट्य पूर्ण असलेल्या सरोवरमुले राज्याचे वैभव जगात आहे. लोणारच्या प्रस्तावित विकास आरखड़यातील विकास कामाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवार (ता.5) लोणार येथे येत असून त्यांच्या लोणार भेटीने लोणारकरांच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.


लोणार येथील सरोवर पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक लोणारला भेट देतात. मात्र, याठिकाणी आल्यानंतर येथील असुविधांचा डोंगर पाहून त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहत नाही.

लोणार हे राज्य नव्हे तर देशातील अ वर्ग दर्जा प्राप्त पर्यटनस्थळ असून याठिकाणी सुविधा ही त्याच पटीत असणे आवश्यक आहे. मात्र, तसे दिसून येत नाही. लोणारला विकासाचा बुस्ट मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोणारसाठी काय घोषणा करतील याकडे लोणार वासियांच्या अपेक्षा लागल्या आहे.

लोणारचा शाश्‍वत विकास करणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही असे मत व्यक्त होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com