Akola : भोंदू तांत्रिक बाबाविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola news

Akola : भोंदू तांत्रिक बाबाविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला : विवरा येथे प्रशांत रामकृष्ण मेसरे या युवकाच्या मृत्यू झाल्याचे दाखवून त्याला जिवंते केल्याचा बनाव करणारा भोंदू तांत्रिकबाबा दीपक उर्फ सागर गणेश बोरले याच्याविरुद्ध चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Akola : केशवनगरचा कारखाना सुरू होणार!

विवरा येथे प्रशांत रामकृष्ण मेसरे हा युवक मरण पावला आहे व त्याचे प्रेत अत्यविधीकरिता त्याचे नातेवाईक तिरडीवर घेवून जात असताना गावतील वेशी जवळ विवरा येथीलच तांत्रिक बाबा दीपक उर्फ सागर गणेश बोरले याने प्रशांत रामकृष्ण मेसरे याचा भाऊ गोपाल रामकृष्ण मेसरे यास प्रशांतला ला माझे कडे घेवून चला मी त्याला जिवंत करतो, असा दावा केला.

हेही वाचा: Akola : कपाशीवर लाल्या; शेतकरी चिंतेत!

तेव्हा प्रशांत मेसरे याचे नातेवाईक त्याला घेवून परिया माता मंदिराकडे गेले व प्रशांत याला जिवंत करण्याची प्रकीया सुरू आहे, अशी माहिती चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांना मिळाली. त्यांनी विवरा गाव येथे जाऊन पाहणी केली असता गावात लोकांची खूप गर्दी जमा झाली होती. लोकामध्ये युवकाला जिवंत केले जात असल्याची चर्चा सुरू होती.

हेही वाचा: Akola : ४४ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

ठाणेदार योगेश वाघमारे यांना हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटल्याने त्यांनी घटनास्थळी जावून पाहिले असता त्या ठिकाणी त्रिशुल, मोरपिस, कापुरडबी, पुजेचे सामान, आरतीचे ताट, हळदी कुंक, पंचपाळे, आणि कवळ्याची माळ देवीची ओटी भरण्याचे साहित्य दिसून आले. ठाणेदार योगेश वाघमारे यांनी सत्यता पडताळणीकरिता प्रशांत मेसरे याची वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चतारी येथे वैद्यकीय तपासणी केली .

हेही वाचा: Akola : दिवाळीत वाढली फुलांची मागणी

वैद्यकीय अधिकारी यांनी प्रशांत मेसरे याची प्रकृती चांगली असून, तो ठणठणीत असल्याचे सांगितले. तांत्रिकबाबा बोरले याने लोकांचे श्रध्देचा गैरफायदा घेवून प्रशांत मेसरे यास तो मरण पावला नसताना, तो मरण पावला आहे असे गावातील लोकांना व त्याचे नातेवाईकांना भासवून जिवंत केलेल्याचा दावा केला.

हेही वाचा: Akola : दहा महिन्यात एक लाखावर वाहनांकडून नियमभंग

ही कृती लोकांना फसविणे व समाजामध्ये अंधश्रध्दा वाढविण्यास कारणीभूत असल्याचे सत्यता पडताळणी वरून निष्पन्न झाले. त्यावरून भोंदूबाबा बोरले याचे हे कृत्य कलम ५०५,भादंवि, सहकलम ३, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटण करण्याबाबत अधिनियम २०१३ प्रमाणे असल्याने पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. जनतेने कोणत्याही अफवांना व अंधश्रध्देला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी नागरीकांना केले आहे.

हेही वाचा: Akola : लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागिय पोलिस अधिकारी बाळापूर गोकुल राज यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.योगेश वाघमारे, पोउपगि.गजेश महाजन यांनी केली आहे.