esakal | खळबळजनक; रुग्णालयातून कोरोनाची लस गेली चोरीला!
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola Corona News Corona vaccine stolen from Pathur Hospital!

कोला जिल्ह्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून कोरोना प्रतीबंधक लसीच्या सात कुप्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उशीरा उघडकीस आला आहे.

खळबळजनक; रुग्णालयातून कोरोनाची लस गेली चोरीला!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देशभरात ही लस पुर्णतः मोफत दिली जात आहे.  मात्र असे असले तरी अकोला जिल्ह्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून कोरोना प्रतीबंधक लसीच्या सात कुप्या चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उशीरा उघडकीस आला आहे.

यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.पातुर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयात ५ फेब्रुवारीपासून कोविड १९ कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ५ फेब्रुवारीपासून दररोज किती लस देण्यात आल्या याची नोंद घेऊन लस कोविड कक्षात ठेवल्या जात होत्या.

हेही वाचा - धोका वाढला; शाळा, शिकवणी २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

११ फेब्रुवारी रोजी पर्यंत सर्व व्यवस्थित होते. परंतु १२ फेब्रुवारी रोजी ७ कुप्या गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. सदर प्रकार उघडकीस आल्याच्या चार दिवसानंतर मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजीच्या रात्री चान्नी पोलिसात तक्रार देण्यात आली. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध योजना राबवून कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे मात्र ग्रामीण रुग्णालयाचा पाडलेल्या कारभारामुळे हा प्रकार घडला आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू