esakal | धोका वाढला; सलग दुसऱ्या दिवशी दोनशेवर पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

Akola Corona News Two hundredth positive for the second day in a row}

 जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच असून, गुरुवारी २३५ रुग्ण आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही २४२ रुग्णांची भर पडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून शुक्रवारी कोरोना संसर्ग तपासणीचे ७५४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५१२ अहवाल निगेटीव्ह तर २४२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

धोका वाढला; सलग दुसऱ्या दिवशी दोनशेवर पॉझिटिव्ह
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच असून, गुरुवारी २३५ रुग्ण आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही २४२ रुग्णांची भर पडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून शुक्रवारी कोरोना संसर्ग तपासणीचे ७५४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५१२ अहवाल निगेटीव्ह तर २४२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
शुक्रवारी दिवसभरात ७५४ अहवाल प्राप्त झाले. त्यात सकाळी १५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते. त्यात ६० महिला व ९७ पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा - धोका वाढला; रविवारी संपूर्ण दिवसभर तर दररोज रात्रीची संचारबंदी

त्यातील मूर्तिजापूर येथील २२, अकोट येथील १३, मनकर्णा येथील आठ, सिंधी कॅम्प येथील सात, डाबकी रोड व तापडीया नगर येथील प्रत्येकी सहा, खदान पोलिस स्टेशन येथील पाच, पातूर, खडकी, गोरक्षण रोड, कौलखेड, जठारपेठ, जीएमसी व न्यू शिवाजी नगर येथील प्रत्येकी चार, उमरी, बाळापूर व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, पोलिस हेडक्वॉटर, गीतानगर, रणपिसेनगर, मलकापूर, हरिहर पेठ, विद्यानगर, लक्ष्मीनगर, वनी वेताल ता.अकोट व मलानी वाटीका येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित कान्हेरी गवळी, हनवाडी, न्यू जैन टेम्पल, गीरी नगर, तुकाराम चौक, रजपूतपुरा, येवदा, लक्ष्मी अर्पाटमेन्ट, बाभुळगाव, इम्ब्राड कॉलनी, वाशिम रोड, शिवनी खदान, मित्रनगर, देशमुख फैल, राम नगर, केशवन नगर, हिंगणा रोड, गजानन पेठ, न्यु गोयका लेआऊट, न्यु पोदार स्कूल,मोठी उमरी, कॉग्रेस नगर, मो.अली रोड, वृंदावन नगर, बेलोदे लेआऊट, घुसर, जूने शहर, राऊतवाडी, उमरी, सुकली ता.अकोट, मोरेश्वर कॉलनी, आरोग्य नगर, यमूना तरंग, जीएमसी हॉस्टेल व नवे गाव येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी ८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३४ महिला व ५१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर येथील १९, जठारपेठ येथील आठ, आदर्श कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड, कौलखेड व माधवनगर येथील प्रत्येकी तीन जण, गड्डम प्लॉट, वाशीम बायपास, काँग्रेसनगर, जलतारे प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रिंगरोड, मोमिनपुरा, मोरेश्वर कॉलनी, तुकाराम चौक, बायपास रोड, मोहारी, सातव चौक, रतनलाल प्लॉट, मनकर्णा प्लॉट, कास्तकार भवन, रजपुतपुरा, रेणुकानगर, लहान उमरी, अमान खॉ प्लॉट, लक्ष्मी नगर, मोठी उमरी, उमरी नाका, चेलका ता. बार्शी टाकळी, आनंद नगर, डाबकी रोड, चोहोट्टाबाजार, सिंधी कॅम्प, कीर्ती नगर, जुने शहर, रामनगर, सीएस ऑफिस, चतुर्भुज कॉलनी, उगवा, वडाळी देशमुख, केळीवेळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

हेही वाचा -अबब! आठ दिवसात तब्बल पावणे दोनशे कोरोना बाधीत

३७ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १८, आयकॉन हॉस्पिटल मधून पाच, स्कायलार्क हॉटेल येथून चार, बिहाडे हॉस्पिटल मधुन तीन, सुर्यचंद्र हॉस्पिटल मधुन एक, ओझोन हॉस्पिटल मधुन दोन, तर होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या चार जणांना अशा एकूण ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा -मास्क घालूनच बाहेर पडा नाही तर दंड, आतापर्यंत ४५ हजारांचा दंड झाला वसूल


दोघांचा मृत्यू
शुक्रवारी दुपारनंतर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मूर्तिजापूर येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णास ता. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा रुग्ण हरिहरपेठ अकोला येथील ७३ वर्षी पुरुष असून, या रुग्णासही ता.१८ रोजी दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा -कुणी चोरली ग्रामीण रुग्णालयातील कोरोनाची लस?

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६२४ वर
अकोला जिल्ह्यात आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या १३ हजार ३९३ आहे. त्यातील ३४८ जणांचा मृत्यू झाला आहे. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११ हजार ४२१ आहे. तर सद्यस्थितीत १६२४ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू