या टोळीचे कारणामे बघून तुम्हीही अचंबित व्हाल, एक-दोन नव्हे चक्क २२ ठिकाणी केली चोरी

Akola Crime News Robbery gang at 22 places, police action
Akola Crime News Robbery gang at 22 places, police action

अकोला : गुन्हेगारांचा विक्रम नोंदविण्याची व्यवस्था असती तर अकोल्यातील या टोळीचे नाव या विक्रमाच्या यादीत नक्कीच आले असते. टोळीने केलेले कारमाने बघून तुम्हीही अचंबित व्हाल. एक-दोन नव्हे तर चक्क २२ ठिकाणी चोरी करून धान्य पळविल्याच्या घटना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांची टोळी जेरबंद केल्यानंतर उघडकीस आली.


बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात ता. ५ फेब्रुवारीला रविंद्र किसनराव सानप या कान्हेरी सरप येथील शेतकऱ्याने धान्य चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. शेतातील गोदामाचे कुलुप तोडून सोयाबीन व तुरीचा एक लाख ६८ हजार ७४४ रुपयांचा माल चोरीला गेला होता. ही तक्रार दाखल झाल्यानंतर धान्य चोरीच्या इतरही घटनांबाबत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी माहिती घेतली. तेव्हा अनेक गुन्हे या संदर्भात दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांना धान्य चोरीच्या तपासासाठी विशेष पथक गठीत करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सपकाळ यांनी सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांचे नेतृत्वात पथक गठीत करुन तपास सुरू केला. या पथकाने अल्पावधीतच धान्य चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.

हेही वाचा - Corona Update : पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी

यांना घेतले ताब्यात
पथकाने केलेल्या तपासात शेख रफिक शेख बशीर (वय ५०) या सिध्दार्थ वाडी नायगाव, अकोट फैल येथे राहणाऱ्या संशयीत आरोपीसह भारतनगरातून सैयद अमीन सैयद अली (वय २५) व शाबादनगरातील ख्वाजा इम्रानउद्दीन ख्वाजा अमीरोद्दीन (वय ३० वर्ष) यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी दोन अन्य साथीदारांसह मिळून सन २०१९ पासून आजपर्यंत केलेल्या चोरीची माहिती दिली. तेव्हा चक्क २२ गुन्ह्यांचा उलगडा झाला.

येथे दाखल होते गुन्हे
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलिस स्टेशनमध्ये दाखल धान्य चोरीच्या गुन्ह्यासह बाळपूर, दहिहांडा, उरळ, जुने शहर, पातुर, माना, चान्नी आणि तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये दाखल एकूण २२ धान्य चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा आरोपींनी दिलेल्या माहितीवरून झाला. आरोपींकडून पाच लाख १६ हजार ४०० रुपये, गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन मिनी ट्रक क्र. एमएच ३० बीडी ०६१७ तसेच मो.सा क्रमांक एमएच ३० बीके १४५३ व गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल असा एकूण ११ लाख ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

हेही वाचा - रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?

या पथकाने केली कारवाई
पोलिस अधीक्षक व अप्पर पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ, नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, गणेश पांडे, अश्विन मिश्रा, गोकुळ चव्हाण, शक्ती कांबळे, शेख वसिम, किशोर सोनोने, गोपाल पाटील, अनिल राठोड, प्रवीण कश्यप व विजय कपले, सायबर पोलिस स्टेशनचे ओम देशमुख, गणेश सोनोने, गोपाल ठोंबरे यांच्या पथकाने हा गुन्‍हा उघडकीस आणला.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com