Akola : डेंगी आजाराचा धोका

संपूर्ण नियंत्रणासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक
 Akola dengue disease
Akola dengue disease esakal

अकोला : डेंगीसारख्या आजारांचा धोका कमी झाला असली तरी संपूर्ण नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळे अधूनमधून डेंगी आजार डोकं वर काढत असते. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करून उपाययोजना गांभिर्याने राबविण्याची आवश्यकता आहे.

 Akola dengue disease
Akola : आ.प्रकाश भारसाकळेकडून पूर परिस्थितीची पाहणी

गेले दोन वर्षात डेंगी आजाराच्या रुग्णामध्ये कमालीची घट झाली आहे. डेंगी आजाराला संपूर्णपणे हद्दपार करण्‍याच्‍या दृष्‍टीने मलेरिया विभागाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. ज्‍यामध्‍ये डेंगी जोखीम प्रस्त भागाची विविध पद्धतीने तपासणी करून त्या भागात किटकशास्त्रीय सर्वेक्षणांतर्गत ताप सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षणात डास अळी नाशकाचा उपयोग करुन डासांची घनता कमी करणे, कोरडा दिवस पाडणे, फवारणी, धुरळणी करणे व संडासाच्या व्हेटपाईपला नायलॉन डास रोधक जाळीदार टोपी लावणे किंवा पातळ कापड बांधणे असे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. डेंगी प्रसार हा एडीस इजिप्टॉय नावाच्या डासांच्या मादी मार्फत पसरविल्या जातो. या डासाची उपत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते तसेच वैज्ञानिक अभ्‍यासामध्‍ये असे आढळून आले की, या डासांची ३० ते ४० टक्‍के उत्‍पत्‍ती ही सेप्‍टिक टँकमध्‍ये होते.

 Akola dengue disease
Akola : ६० हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा!

या करा उपाययोजना

डासांचा प्रादुर्भाव मुळे हिवताप, डेंगी, चिकून गुनिया, मेंदुज्वर या सारखे प्राणघातक आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. हिवताप, डेंगी, चिकून गुनिया, मेंदुज्वर या सारखे प्राणघातक जीव घेणे आजार मोठ्या प्रमाणात पसरू नये म्हणून शहरातील नागरिकांनी टेरेस व जमिनीवरील पाण्याचे टाके, हौद, राजन, ड्रॅम यांना नेहमी झाकुन ठेवावे. भंगार साहित्य निरुपयोगी वस्तूची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवावे. कुंडीमधील पाणी, पक्षी किंवा मोकाट गुरांना पिण्याकरिता ठेवली असल्यास भांड्यामधील पाणी शक्यतो दररोज बदलावे. नागरीकांनी आपल्या संडासाच्या व्हेटपाईपला नायलॉन जाळीदार टोपी (कॅप) लावणे किंवा पातळ कापड बांधणे आवश्यक आहे. हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया, मेंदुज्वर या सारखे आजारांचा प्रादुर्भावावर पूर्णपणे नियंत्रण आणण्‍यासाठी या उपाययोजना करून सहकार्य करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com