श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा, या सहा वस्तुंचा समावेश

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारीपासून ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा, या सहा वस्तुंचा समावेश

Akola Anandachi Shidha Supply: श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२ जानेवारीपासून ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे तीन लाख ४४ हजार ५९२ आनंदाच्या शिधा संचाची मागणी केली होती, परंतु शासनाने केवळ तीन लाख २१ हजार ८१ संच मंजूर केले आहे.

शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत शासनादेश जारी केला असून मागणीच्या तुलनेत जिल्ह्यासाठी २३ हजार ५११ संच कमी मिळणार आहेत. त्यामुळे शासनाने शिधा पुरवठ्‍याला कात्री लावल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस समाविष्ट असलेले शिधाजिन्नस संच ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सदर धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. ई-पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपयांमध्ये प्रतिसंच या सवलतीच्या दराने आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येईल. त्यानुसार जिल्ह्यातील तीन लाख ४४ हजार ५९२ रेशनकार्डधारकांना आनंदाच्या शिधा वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे मागणी नोंदवली. परंतु शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्ह्यासाठी केवळ तीन लाख २१ हजार ८१ संच मंजूर केले आहेत. त्यामुळे तब्बल २३ हजार ५११ कमी संच पुरवठ्याने लाभार्थ्यांना संच वाटप करताना पुरवठा विभागाची गोची होणार आहे.

असे होणार वाटप
एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच ‘आनंदाचा शिधा’ म्हणून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. एक शिधाजिन्नस संच प्रती शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे शंभर रुपये या दराने वितरीत करण्यात येईल. २२ जानेवारी ते २९ फेब्रवारी २०२४ या कालावधीत सदर संचाचे वाटप करण्यात येईल. जिल्ह्यासाठी जस्ट युनिव्हर्सल प्रा.लि. यांना पुरवठ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा, या सहा वस्तुंचा समावेश
Lalu Yadav: खर्गे, पवार, ममतांनंतर आता लालूंचाही नकार! राम मंदिर सोहळ्याला लावणार नाहीत हजेरी

अशी केली होती मागणी
अंत्योदय अन्न योजनेच्या ४५ हजार ५७८ कार्डधारकांसाठी आनंदाच्या शिधाची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यासोबतच प्राधान्य कुटुंबातील दोन लाख ७० हजार ४६९ व ३० हजार ९६३ शेतकरी शिधापत्रिकाधारक अशा एकूण तीन लाख ४४ हजार ५९२ लाभार्थ्यांसाठी शिधाजिन्नस संचाची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. परंतु शासनामार्फत संपूर्ण जिल्ह्यासाठी तीन लाख २१ हजार ८१ संच पुरवठा करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी तीन लाख ४४ हजार ५९२ आनंदाच्या शिधा संचाची मागणी करण्यात आली होती. शासनाने तीन लाख २१ हजार ८१ संच मंजूर केले आहेत. संच प्राप्त होताच लाभार्थ्यांना वाटप सुरू करण्यात येईल- अनिल माचेवाड
प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा, या सहा वस्तुंचा समावेश
IPL 2024: 'काही फरक पडत नाही...', हार्दिक पांड्याने गुजरात सोडल्यानंतर मोहम्मद शमीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com