esakal | ३३५ ग्रा.प. सदस्य बिनविराेध, राजकीय कुरघोड्या सुरू; प्रचारात उमेदवारांचा लागणार कस
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News 335 G.P. Members continue unopposed, political puppets; Candidates will have to work hard in the campaign.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, जिल्ह्यातील एकूण ३३५ सदस्यांची अविरोध निवड झाली आहे.

३३५ ग्रा.प. सदस्य बिनविराेध, राजकीय कुरघोड्या सुरू; प्रचारात उमेदवारांचा लागणार कस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, जिल्ह्यातील एकूण ३३५ सदस्यांची अविरोध निवड झाली आहे.

उर्वरित सदस्यांच्या निवडीसाठी प्रचाराला सुरुवात झाली असून, राजकीय कुरघोड्यांनी वेग घेतला आहे. प्रचारात उमेदवारांचा चांगलाच कस लागत आहे.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या निवडणूक रिंगणात ४ हजार ७०० उमेदवार आहेत. यात १० गावांमधील ३० प्रभागातील ७४ सदस्यांची निवड अविरोध झाली आहे. याशिवाय उर्वरित २१४ ग्रामपंचायतमध्ये ३३५ सदस्यही बिनविरोध झाले आहे. आता उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी प्रचाराने वेग धरला आहे. राजकीय कुरघोडीत कोणाची सरसी होणार हे १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानानंतर स्पष्ट होईल. तुरतास उमेदवारांचा प्रचारात चांगलाच कस लागत आहे.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

अविराेध झालेले एकूण सदस्य
तालुका सदस्य संख्या बिनविराेध संख्या
तेल्हारा ३२२ ९९
अकाेट ३३६ ५६
मूर्तिजापूर २४९ ३५
अकाेला ३५८ २१
बाळापूर ३४१ ४७
बार्शीटाकळी २४३ ४४
पातूर २२१ ३३
एकूण २०७० ३३५

हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला

अकोट तालुक्यात ३८ ग्रामपंचायतींपैकी तीनबिनविरोध
अकोट ः तालुक्यातील मुदत संपलेल्या ३५ ग्रामपंचायतीच्या ३०९ जागांसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जापैकी ७०५ उमेदवार रिंगणात राहिले आहे. ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ३५ ग्रामपंचायतीमध्ये ही निवडणूक होणार आहे. ३५ ग्रामपंचायतीमध्ये ११३ प्रभागात, ३०९ जागेसाठी, ७०५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तालुक्यात पूर्णतः बिनविरोध झालेल्या तीन ग्रामपंचायती अनुक्रमे लाडेगाव, कोहा, मंचनपूर ग्रामपंचायतीमधील ९ प्रभागातील २१ ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आले आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी होती तसेच या दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप देखील करण्यात आले. यामध्ये २०१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ७०५ उमेदवार ३५ ग्रामपंचायत मधून निवडणूकीला सामोरे जात आहे.
आता ता. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image