कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; १७ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 December 2020

कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाचे शनिवारी (ता. २६) १७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. याव्यतिरीक्त एका रुग्णाचा खासगी रुग्णालयात बळी सुद्धा गेला. सदर व्यक्ती ८० वर्षीय पुरुष होते. ते मोहिते प्लॉट, अकोला रहिवासी होते. त्यांना १९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

अकोला: कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाचे शनिवारी (ता. २६) १७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. याव्यतिरीक्त एका रुग्णाचा खासगी रुग्णालयात बळी सुद्धा गेला. सदर व्यक्ती ८० वर्षीय पुरुष होते. ते मोहिते प्लॉट, अकोला रहिवासी होते. त्यांना १९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोना संसर्ग तपासणीचे शनिवारी (ता. २६) १९५ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७८ अहवाल निगेटिव्ह तर १७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आठ महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

त्यातील तीन जण खडकी येथील, दोन जण मोठी उमरी येथील तर उर्वरीत कंगरवाडी, कावासा, जुने शहर, खोलेश्वर, दुर्गा चौक, टॉवर चौक, आळशी प्लॉट, मूर्तिजापूर, दानापूर ता. तेल्हारा, बार्शीटाकळी, देशमुख फाईल आणि मूर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांमध्ये भर पडली असली तरी सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५२३ झाली आहे.

१३१ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १४, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, आयकॉन हॉस्पिटल येथुन तीन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक व हॉटेल रिजेन्सी येथून दोन तर होम क्वारंटाईन असलेले १०६ अशा १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा - कोरोनाची धास्ती, उडाली झोप, इंग्लंडवरून अकोल्यात पोहोचलेल्या आठ प्रवाशांमुळे वाढली डोकेदुखी

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १०३३३
- मृत - ३१६
- डिस्चार्ज - ९४९४- ॲक्टिव्ह रुग्ण - ५२३

(संपादन - विवेक मेतकर)

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Another dies due to corona; 17 new positives