उमेदवार मुख्यध्यापकांना देत आहेत धमकी - विनोद नरवाडे 

 Akola Marathi News candidates are threatening the headmaster - Vinod Narwade
 Akola Marathi News candidates are threatening the headmaster - Vinod Narwade

रिसोड (जि.वाशीम) : शिक्षक मतदार संघातील पराभूत उमेदवारांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोगस मतदान प्रकरणीक मुख्याध्यापकावर कारवाईची धमकी देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद नरवाडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणूक संपली आहे बरेच उमेदवार रिंगणात होते. परंतु, काही पराभूत उमेदवार बोगस मतदान झाले आहे हे कारण पुढे ठेवून मुख्याध्यापकावर कारवाईची धमकी देत आहेत. एवढेच नव्हे तर बोगस मतदान प्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करण्याची भाषा बोलत आहेत. परंतु, त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याचे सोडून मुख्याध्यापकांना धारेवर धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

कोर्टकचेरीच्या धमक्या देत आहेत व पराभूत झाल्यांमध्ये काही मतदान प्रक्रियेवर तर काही बोगस मतदानावर बोट ठेवून निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करत आहेत. यांना खरी लोकशाही समजलेली नाही. मतदारसंघातील मतदार हा सुशिक्षित आहे. त्यांना कोणाला मतदान करा असेही सांगण्याची गरज नाही. निवडणुकीत पराभवाने पछाडलेले व पराभूत उमेदवार मुख्याध्यापकांना वेठीस धरत आहेत. त्यांनी आपली वाचाळ वीरता थांबविली नाही तर समस्त मुख्याध्यापक संघ त्या मुख्याध्यापकाच्या पाठीमागे उभा राहील.

त्याचप्रमाणे निवडणूक संपली की, शिक्षकांची व त्यांच्या समस्यांशी सबंध तुटलेले काही पराभूत उमेदवार विनाकारण मुख्याध्यापकांना वेठीस धरत आहेत. मुख्याध्यापक हा ही मतदार आहे सदर प्रकरणी मुख्याध्यापकाचा कुठलाही संबंध नसून सदर प्रक्रियेतून मुख्याध्यापकांची नावे वगळावी. अखिल महाराष्ट्रातील मुख्याध्यापक संघ हा एकसंघ असून मुख्याध्यापकांच्या वाटेला जाल तर मुख्याध्यापक संघ त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

मुख्याध्यापक संघ काय करू शकतो याचा अनुभव मागील निवडणुकीत चांगला चालला असेल पुढेही असेच वागाल तर जिल्ह्यातील नव्हे तर समस्त महाराष्ट्रातील मुख्याध्यापक पेटून उठतील. यापुढे मुख्याध्यापकावर कारवाईची भाषा सहन करणार नाही. कारवाईची भाषा करण्यापेक्षा पराभूत उमेदवारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे असे नरवाडे अध्यक्ष मुख्याध्यापक संघ वाशीम जिल्हा यांनी कळविले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com