वातावरणात बदललय, आर्द्रतेचाही वाढला टक्का

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 4 January 2021

 दोन आठवड्यापासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरुन किमान तापमान दहा ते १२ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. परंतु, गेल्या दोन दिवसात वातावरणात बदल झाला असून, आर्द्रतेचा टक्का वाढण्यासोबतच थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे.
 

अकोला : दोन आठवड्यापासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरुन किमान तापमान दहा ते १२ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. परंतु, गेल्या दोन दिवसात वातावरणात बदल झाला असून, आर्द्रतेचा टक्का वाढण्यासोबतच थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्याची सुरुवात अपेक्षेपेक्षा उशिराच झाली. परंतु, पर्जन्यमान अपेक्षेपेक्षा अधिक झाले. त्यामुळे यंदा हिवाळ्यात गारवा अधिक जाणवेल अशी अकोलेकरांना अपेक्षा होती.

शिवाय उत्तरेकडून येणारे कार वारे विदर्भातील बोचऱ्या थंडीला कारणीभूत असतात. यंदाही तशी थंडीची लाट म्हणजे कडाक्याची थंडी जाणवायला सुरुवात झाली होती. शिवाय जानेवारीचा पहिला पंधरवाडा थंडीच्या लाटेचा राहून किमान तापमान पाच अंशसेल्सिअस पर्यंत, कदाचित त्याहूनही खाली जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली होती.

परंतु, दोन दिवसांपासून अचानक आर्द्रता वाढली असून, काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे थंडीची लाट सध्यातरी काही प्रमाणात ओसरल्याचे चित्र आहे. मात्र हवामान विभागाकडून कोठेही पाऊस पडण्याचे संकेत नाहीत. रविवारी (ता.३) तापमानातही वाढ होऊन कमाल ३०.४ तर, किमान १७.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. आर्द्रतेमध्ये सुद्धा १० ते २० टक्क्यांनी अधिकची नोंद झाली आहे.

पिकांना धोका
वातावरणात अचानक बदल झाल्याने व तापमान वाढल्याने पिकांवर कीडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, वेळीच आवश्‍यक ते व्यवस्थापन, उपाययोजन करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

 

हेही वाचा -

पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!

उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!

तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News The environment has changed, the humidity has also increased