‘बर्ड फ्लू’ची धास्ती; चिकन मार्केंट पडली ओस

Akola Marathi News- Fear of Bird Flu Chicken market fell dew
Akola Marathi News- Fear of Bird Flu Chicken market fell dew

अकोला : कोरोना विषाणूचा विळखा कमी होत असतानाचा राज्यात बर्ड फ्लू या विषाणूजन्य रोगाने डोके वर काढले आहे. अकोला जिल्ह्यात तूर्तास या रोगाचा प्रादुर्भाव नसला तरी गत आठवड्यात दहीगाव गावंडे येथे काही कावळे संशयास्पदरित्या मृत आढळल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.

दरम्यान बर्ड फ्लू हा रोग पक्षी व कोंबड्यांंना होतो. त्यामुळे चिकन वर ताव मारणाऱ्यांनी आता चिकन पासून पळ काढला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स व भोजनालयांसह मांसाहार करणाऱ्यांच्या घरात सुद्धा चिकनला नापसंत करण्यात येत आहे. परिणामी चिकन मार्केट ओस पडले असून चिकनचे भाव सुद्धा गडगडले आहेत.

हेही वाचा - कोरोना लसीकरणानंतर दोन महिलांना आली रिॲक्शन!

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबड्या आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे. गत आठ-दहा महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे संपूर्ण जग हादरले. कोरोनाची लस तयार झाली आणि लसीकरणाला सुरूवात सुद्धा झाली असतानाच राज्यात ‘बर्ड फ्लू’ सारख्या रोगाने एंट्री केली.

त्यामुळे आधीच दडपणात असलेल्या आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एका रोगाची भर पडली. दुसरीकडे कोरोनापासून सुटकेचा निश्वास टाकत असतानाच सामान्य नागरिकांना बर्ड फ्लूचा या आजाराने धास्ती पाडली. या रोगाचा सर्वाधिक प्रभाव पोल्ट्री व्यवसाय व चिकन विक्रेत्यांच्या व्यवसायावर होत आहे. बर्ड फ्लूच्या धास्तीने अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली असून व्यावसायीकांचे चांगलेच कंबरडे मोडत आहे. आता व्यवसायीक ग्राहकांची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहेत.

अंड्याच्या विक्रीत ४० रुपयांची घट
‘बर्ड फ्लू’ च्या अफवेमुळे गत आठवड्यात प्रति ट्रे १६० रूपये दराने विकल्या जाणाऱ्या ट्रे च्या किमती खसरल्या आहेत. ग्राहक संख्या नसल्याने ४० रूपये कमी दराने अंड्याचे ट्रे विकण्याची वेळ अंडे विक्रेत्यांवर आली आहे. एकूणच बर्ड फ्लू ची धास्ती नागरिकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

माणसात विषाणूच्या शिरकावाची शक्यता कमीच
तज्ज्ञांच्या मते एच५एन१ हा विषाणू माणसामध्ये येण्याचे भारतात प्रमाण कमी आहे. दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्वयंपाक बनविण्याच्या पद्धतीत लक्षणीय फरक यामागचे कारण आहे. हा विषाणू ७० डिग्री सेल्सियसच्या वरील तापमाण मारतो. दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलना केली तर भारतात जवळपास सर्वच ठिकणी जेवण बनविताना पुरेशा प्रमाणात शिजवले जाते. चिकन-मटण, अंडी १०० डिग्री सेल्सियसच्या वरच शिजवल्यामुळे माणसांत हा विषाणू चिकन आणि अंड्याच्या माध्यमातून येण्याची शक्यता फार कमी आहे.

हेही वाचा - कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी

या विषाणूचा मानवावर काही परिणाम होत नाही हे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. परंतु, ‘बर्ड फ्लू’ ने महाराष्ट्रात एंट्री केल्याने नियमितपेक्षा ग्राहकांची संख्या ३०-३५ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे.
- राज जगताप, व्यवसायीक, अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com