esakal | काळीज पिळवटून टाकणारी घटना; सावत्र आईने दिले चिमुकल्याला गरम तव्यावर चटके, मामाला सांगितली आपबिती
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Finally, a case was filed against 'that' stepmother, the case of giving clicks to Chimukalya; The boy told Mama

आठ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना जवळा बाजार येथे घडली होती. पीडित बालकाने त्याच्या मामाला आपबिती सांगितली. प्रकरणी बालकाच्या मामाच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी सावत्र आईविरुद्ध शनिवारी (ता.२६) गुन्हा दाखल केला आहे. 

काळीज पिळवटून टाकणारी घटना; सावत्र आईने दिले चिमुकल्याला गरम तव्यावर चटके, मामाला सांगितली आपबिती

sakal_logo
By
शाहीद कुरेशी

अखेर ‘त्या’ सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल, चिमुकल्याला चटके दिल्याचे प्रकरण; बालकाने मामाला सांगितली

मोताळा (जि. बुलडाणा)  : आठ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना जवळा बाजार येथे घडली होती. पीडित बालकाने त्याच्या मामाला आपबिती सांगितली. प्रकरणी बालकाच्या मामाच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी सावत्र आईविरुद्ध शनिवारी (ता.२६) गुन्हा दाखल केला आहे. 


नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथील आर्यन सचिन शिंगोटे हा चिमुकला लहान असताना त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. मुलाचा सांभाळ करण्यासाठी वडील सचिन रामेश्वर शिंगोटे यांनी दुसरे लग्न केले.

हेही वाचा - गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

दुसऱ्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी असल्याची माहिती आहे. आर्यन सावत्र आई शारदा शिंगोटे, वडील सचिन शिंगोटे व भावंडांसह जवळा बाजार येथे राहतो. १५ डिसेंबरला सकाळी सात वाजताच्या सुमारास आर्यन घरात भावंडांसोबत खेळत असताना घरातील लोखंडी आलमारीला त्याचा धक्का लागला.

त्यामुळे आलमारी त्याची लहान बहीण लक्ष्मीच्या अंगावर पडत होती. तेव्हा आई शारदा शिंगोटे यांनी आलमारी पकडली. त्यानंतर संतप्त शारदा शिंगोटे यांनी लोखंडी तवा गरम करून त्या तव्यावर आर्यनला उभे केले. त्यामुळे चिमुकल्या आर्यनचे दोन्ही तळपाय भाजल्याने तो जखमी झाला.

हेही वाचा -  गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

जखमी आर्यनला सुरुवातीला खामगाव उपजिल्हा रुग्णालय व नंतर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, सावत्र आई शारदाने चिमुकल्या आर्यनला गरम तव्यावर उभे करून त्याचे तळपाय भाजल्याची पोस्ट सोशल मीडियावर जोमात फिरली. त्यामुळे सावत्र आईच्या निर्दयीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. 

हेही वाचा - नक्षलवादी होणाचा विचार येणे, हे तर राज्यकर्त्यांचे अपयश, सरकारला लाज कशी वाटत नाही?- रविकांत तुपकर

दरम्यान, बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, पीएसआय अनिल भुसारी व सहकाऱ्यांनी या व्हायरल पोस्टची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी रविवारी जवळा बाजार येथे धडक देऊन आर्यनची इन-कॅमेरा चौकशी केली. तेव्हा आर्यनने शेकोटीवर हातपाय शेकताना तळपाय भाजल्याचे पोलिसांना सांगितले.

हेही वाचा - माता न तु वैरणी, पती की बाळ सुरू होती जीवाची घालमेल, मग...

त्यामुळे बोराखेडी पोलिसांनी तशी नोंद घेतली. आर्यनच्या जबाबामुळे पोलिस प्रशासन हतबल झाले. मात्र सावत्र आई शारदाने आर्यनला गरम तव्यावर उभे करून त्याचे पाय भाजले, अशी आपबिती आर्यनने त्याचे मामा वैभव मनोहर मानकर (१९, रा. जयपूर लांडे ता. खामगाव) यांना सांगितली, अशी तक्रार वैभव मानकर यांनी बोराखेडी पोलिसांत दिली आहे. वैभव मानकर यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी शारदा सचिन शिंगोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image