चार वर्षीय चिमुकलीची मृत्यूशी झूंज,मालवाहू व प्रवासी वाहनाची धडक, तीन ठार, पाच गंभीर

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 18 January 2021

अकोला रोड वरील कापशी-चिखलगावच्या दरम्यान वाहवाहू वाहन व खासगी प्रवासी वाहनामध्ये भीषण दुर्घटना झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

पातूर (जि.अकोला) :  अकोला रोड वरील कापशी-चिखलगावच्या दरम्यान वाहवाहू वाहन व खासगी प्रवासी वाहनामध्ये भीषण दुर्घटना झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

या दुर्घटनेत चालकांसह दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका महिलेने उपाचारादरम्यान दम तोडला. अपघातात गंभीर जखमी चार वर्षीय चिमुकली गायत्री ज्ञानेश्वर वंजारे ही खासगी रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत आहे. याव्यतिरीक्त खासगी रुग्णालात इतर पाच जणांवर उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा -अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

खासगी प्रवासी वाहन क्रमांक एमएच-३७-५३८१ हे प्रवासी घेवून पातूरकडे येत असताना पिकअप गाडी क्रमांक एमएच-३०-एल-२९९६ सोबत त्याची शनिवारी (ता. १६) सकाळी भीषण दुर्घटना झाली. दोन्ही वाहनांची अमोरासमोर धडक झाल्याने प्रवासी वाहन चालक संजय राऊत व बाळू बळीराम कुऱ्हे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हेही वाचा -ऐकावे ते नवलंच! या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

दुर्घटनेत चार वर्षीय चिमुकली व इतर प्रवासी सुद्धा गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले, परंतु गंभीर मार लागल्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयातून शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

हेही वाचा -कोरोनाला खवय्येगिरीचा तडका!, फास्टफूड सेंटर, हॉटेल, ढाब्यांवर युवकांची तुफान गर्दी

सदर प्रवाशांपैकी चार वर्षीय चिमुकली गायत्री वंजारे (मु.पो. कळंबेश्वर, ता. मालेगाव, जिल्हा वाशीम) हिच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्यामुळे ती रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत आहे. याव्यतिरीक्त खासगी रुग्णालयातच ज्ञानेश्वर रामभाऊ वंजारे (वय २८), रामभाऊ गोविंदराव वंजारे (वय ५०), दगडाबाई बळीराम कुऱ्हे (वय ५५), भागवत कुऱ्हे (वय ५०) यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी करत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News- Four-year-old girl fights to death, cargo and passenger vehicle collides, three killed, five critical