
रात्री अडीच ते पहाटे पाच वाजताच दरम्यान झाली. चोरी झाल्याचे समजल्यावर वखार महामंडळचे साठा अधीक्षक सुनील प्रकाश शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल प्रदीप गुंजकर तपास करीत आहेत
देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : वखार महामंडळाच्या गोडाऊनचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी गोडाउन मध्ये साठवलेला ५४ कट्टे हरभरा चोरून केल्याची घटना आज (ता.२५) सकाळी उघडकीस आली याबाबत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार चिखली रोड वरील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये नाफेड मार्फत खरेदी केलेला हरभरा साठवून ठेवण्यात आला होता सदर शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी गोडाउन मध्ये प्रवेश केला व ५४ कट्टे हरभरा किंमत सुमारे १ लाख ३० हजार रुपये चोरून नेला.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
ही चोरी रात्री अडीच ते पहाटे पाच वाजताच दरम्यान झाली. चोरी झाल्याचे समजल्यावर वखार महामंडळचे साठा अधीक्षक सुनील प्रकाश शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल प्रदीप गुंजकर तपास करीत आहेत
हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक
मागील वर्षी वखार महामंडळाच्या याच गोडाऊनचे शटर चे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी नाफेड क्या हरभऱ्यावर हात साफ केला होता या चोरीचा अद्यापही तपास लागला नाही
(संपादन - विवेक मेतकर)