
ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार कागदी वा प्लास्टिकच्या राष्ट्र्ध्वजांच्या वापरावर बंदीअसून असे ध्वज उत्पादन करणारे उत्पाद, विक्री करणारे विक्रेते, वितरक, मुद्रक यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
अकोला : ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार कागदी वा प्लास्टिकच्या राष्ट्र्ध्वजांच्या वापरावर बंदीअसून असे ध्वज उत्पादन करणारे उत्पाद, विक्री करणारे विक्रेते, वितरक, मुद्रक यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
कागदी, प्लास्टिकच्या ध्वजांचा वापर थांबविण्यासाठी, नियंत्रण व जनजागृतीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. कार्यालये, प्रतिष्ठाने इ. ठिकाणी ध्वजारोहण करताना भारतीय ध्वजसंहितेत दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.
हेही वाचा - आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण?
वापरण्यास उपयुक्त नसलेले. फाटके, जीर्ण, माती लागलेले रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.
हेही वाचा - शेतात गव्हाच्या पिकाची जागल करण्याकरिता गेले अन् अचानक केला बिबट्याने हल्ला
दरम्यान, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ मंगळवार, ता.२६ रोजी सकाळी सव्वा ९ वाजता लालबहादूर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे होणार आहे.
हेही वाचा - या आज्जीबाईने वयाच्या सत्तरीतही कोरले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव
या समारंभात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
(संपादन - विवेक मेतकर)