खामगाव - जालना रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला 2021 मध्येच सुरुवात व्हावी : रविकांत तुपकर

Akola Marathi News Khamgaon - Jalna railway work should start in 2021: Ravikant Tupkar
Akola Marathi News Khamgaon - Jalna railway work should start in 2021: Ravikant Tupkar

बुलडाणा  ः   1910 मध्ये प्रस्तावित झालेल्या खामगाव - जालना रेल्वे मार्गाच्या तांत्रिक सर्व्हेला तब्बल 110 वर्षांनी सुरुवात झाली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. सर्व्हेनंतर 2021 मध्येच रेल्वेमार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा देखील रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली आहे.


 यावेळी बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, खामगाव - जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न हा तब्बल 110 वर्षांपासून प्रलंबित आहे. हा रेल्वे मार्ग विदर्भ-मराठवाडयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग बुलडाणा जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे.

जिल्ह्याच्या एकंदरीत विकासासोबतच कृषी आणि इतर उद्योगांना चालना देण्यासाठी हा मार्ग अत्यंत लाभदायक आहे. आजपासून खामगाव - जालना रेल्वे मार्गाच्या तांत्रिक सर्व्हेला सुरुवात झाली याचा आम्हांला आनंद आहे.

या रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील जनतेला अनेक वेळा रस्त्यावर उतरावे लागले, रेल्वे लोक आंदोलन समितीला अनेकवेळा आंदोलने करावी लागली. परंतू लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला.  पण जनतेच्या रेट्यापुढे सरकारला झुकावे लागले.

या रेल्वेमार्गाच्या तांत्रिक सर्व्हेला सुरुवात झाली, ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु केवळ सर्व्हे होऊन पुन्हा हा मार्ग थंडबस्त्यात न पडता इतर तांत्रिक बाबी पूर्णत्वास जाऊन 2021 मध्ये या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळून जलदगतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पाहिजे, अशी अपेक्षा रविकांत तुपकरांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी ’स्वाभिमानी’चे राणा चंदन, शे. रफिक शे. करीम, सहदेव लाड, गोपाल जोशी, रामदास खसावत, नेहरुसिंग मेहर, अनिल मोरे, गणेश इंगोलो यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com