esakal | रावसाहेब दानवे म्हणाले, भाजपााल यश मिळणारच ! कसे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Municipal Corporation, BJP will win the municipal elections !, Union Minister of State Raosaheb Danve believes

भारतीय जनता पक्ष हा व्यक्तीगत आधारित पक्ष नसून सामूहिक नेतृत्वाचा पक्ष आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजप बद्दल नेहमीच आदर राहिला आहे, परंतु भाजपला मात देण्यासाठी तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले आहेत

रावसाहेब दानवे म्हणाले, भाजपााल यश मिळणारच ! कसे ते वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला :  भारतीय जनता पक्ष हा व्यक्तीगत आधारित पक्ष नसून सामूहिक नेतृत्वाचा पक्ष आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजप बद्दल नेहमीच आदर राहिला आहे, परंतु भाजपला मात देण्यासाठी तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले आहेत.

असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कुशल नेतृत्व व कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप आगामी महापालिका, नगर पालिका निवडणुकीत भरघोस यश मिळवेल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.

हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

स्थानिक स्व. नामदेवराव पोहरे सभागृह मराठा मंगल कार्यालय येथे दक्षिण-पश्चिम व पश्चिम-उत्तर भाजपा महानगर पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या दुसरी सत्राचे उद्‍घाटक म्हणून शनिवारी (ता. २६) ते बोलत होते.

भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी नाही तर सामान्य नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी स्थापित झालेला पक्ष आहे. जुन्या कार्यकर्त्यांच्या त्याग, तपास्याच्या तसेच विचारसरणीच्या बळामुळेच आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता प्राप्त झाला आहे.

हेही वाचा - कोरोनाची धास्ती, उडाली झोप, इंग्लंडवरून अकोल्यात पोहोचलेल्या आठ प्रवाशांमुळे वाढली डोकेदुखी

कोरोनाच्या महामारीत देशाच्या पंतप्रधानांनी सर्व सामान्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कामांचा प्रचार, प्रसार तसेच पक्षाने राम मंदिर निर्माणाचे काम, कलम ३७० रद्द केल्याची माहिती कार्यकर्त्यांनी सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे ही आवाहन रावसाहेब दानवे यांनी
केले.

कार्यक्रमात आमदार रणधीर सावरकर व आमदार गोवर्धन शर्मा यांनी सुद्धा विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. देवाशिष काकड यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अभ्यास वर्गात मार्गदर्शन
अभ्यास वर्गात हर्षवर्धन देशपांडे, सतीश ढगे, पंजाबराव आव्हाले, रमेश अलकरी, गिरीश जोशी, मोहन पारधी, दिलीप मिश्रा, सिद्धार्थ शर्मा, उमेश गुजर, महेंद्र कवीश्वर, विवेक बिडवाई, योगेश गोतमारे यांनी सोशल मिडीयाचा उपयोग व्यक्तीमत्व विकास, भाजपाचा इतिहास व विकास आपला विचार व परिवार, भाजपची वैचारिक विचारधारा व आपली विचार धारा, आत्मनिर्भर भारत या विषयावर मार्गदर्शन केले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image