esakal | मुश्ताक अली टी- २० क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातील चार खेळाडूंची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Mushtaq Ali Selection of four players from Akola for T20 cricket tournament

येत्या १० ते १९ जानेवारी कालावधीत इंदूर येथे सुरवात होत आहे. या स्पर्धेकरिता विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली करण्यात आली असून, या संघात अकोला क्रिकेट क्लबच्या दर्शन नळकांडे, अथर्व तायडे, आदित्य ठाकरे व मोहित राऊत या चार खेळाडूंची निवड झाली आहे.

मुश्ताक अली टी- २० क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातील चार खेळाडूंची निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे सर्वत्र लॉकडाउन झाल्यामुळे देशातील क्रिकेट बंद पडलो होते. आता नवीन वर्षात प्रथमच देशांतर्गत क्रिकेटला सय्यद मुश्ताक अली टी- २० स्पर्धेपासून सुरुवात होत हे.

येत्या १० ते १९ जानेवारी कालावधीत इंदूर येथे सुरवात होत आहे. या स्पर्धेकरिता विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली करण्यात आली असून, या संघात अकोला क्रिकेट क्लबच्या दर्शन नळकांडे, अथर्व तायडे, आदित्य ठाकरे व मोहित राऊत या चार खेळाडूंची निवड झाली आहे.

हेही वाचा -  गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

विदर्भ संघ हा इलाईट ग्रुप ‘डी’मध्ये आहे. विदर्भाला गटातील राजस्थान, सौराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गोवा या संघासोबत लढत द्यावी लागणार आहे. गेल्या ६-७ वर्षात क्लबच्या खेळाडूंनी अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नाव राष्ट्रीय तथा आंतराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. ही बाब अकोला क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी तसेच आत्मविश्वासात भर टाकणारी आहे, असे मत अकोला क्रिकेट क्लब कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटना अकोला जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - नक्षलवादी होणाचा विचार येणे, हे तर राज्यकर्त्यांचे अपयश, सरकारला लाज कशी वाटत नाही?- रविकांत तुपकर

खेळाडूंच्या निवडी बद्दल त्यांचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, ऑडीटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य ऍड. मुन्ना खान, गोपाळ भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, रणजी खेळाडू रवी ठाकूर, सुमेध डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, शारिक खान, देवकुमार मुधोळकर, एस.टी. देशपांडे, अभिजीत मोरेकर, किशोर धाबेकर तसेच अकोला क्रिकेट क्लब व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोलाच्या खेळाडूंनी चौघांचेही अभिनंदन करून स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

क्लिक करा - अकोला जिल्ह्यात आज काय विशेष ! 

दर्शन नळकांडे
दर्शन नळकांडे हा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाजी करणार असून यापूर्वी दर्शन ने १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९ वर्षाखालील भारतीय संघाचे इंगलंड येथे प्रतिनिधित्व, रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. गेल्या दोन वर्षापासून तो किंग्स एलेवन पंजाब संघाकडून आयपीएल. स्पर्धेचे प्रतिनिधित्व करित आहे.

अथर्व तायडे
अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावखुरा शैलीदार फलंदाज असून, यापूर्वी त्याने सुद्धा १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रणजी ट्रॉफी व इराणी ट्रॉफीसाठी त्याची विदर्भ संघात निवड झाली होती. अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघ हा १९ वर्षाखाली खेळाडूंच्या स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे.

हेही वाचा - माता न तु वैरणी, पती की बाळ सुरू होती जीवाची घालमेल, मग...

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे हा मध्यमगती गोलंदाज असून, त्याने सुद्धा यापूर्वी १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रणजी ट्रॉफी व इराणी ट्रॉफीसाठी त्याचा विदर्भ संघात समावेश होता. न्यूझीलंड येथे १९ वर्षाखालील झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत तो खेळला होता. ही स्पर्धा भारताने जिंकली होती.

मोहित राऊत
मोहित राऊत हा डावखुरा फिरकी गोलंदाज तसेच शैलीदार फलंदाज आहे. या अष्टपैलू खेळाडूने २३ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व व अमरावती विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. वरिष्ठ राष्ट्रीय संघासाठी त्याला प्रथमच संधी मिळाली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image