esakal | राम मंदिरासाठी दिल्यात नऊ चांदीच्या विटा, श्री राम जन्मभूमी न्यासकडे केल्या सुपूर्द
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Nine silver bricks donated for Ram Mandir, handed over to Shri Ram Janmabhoomi Trust

अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी अकोलेकरांनी नऊ चांदीच्या विटा दान दिल्या आहेत. या विटा श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने श्री राम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांच्याकडे सोपविण्यात आल्यात.

राम मंदिरासाठी दिल्यात नऊ चांदीच्या विटा, श्री राम जन्मभूमी न्यासकडे केल्या सुपूर्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी अकोलेकरांनी नऊ चांदीच्या विटा दान दिल्या आहेत. या विटा श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने श्री राम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांच्याकडे सोपविण्यात आल्यात.


श्री रामनवमी शोभायात्रा समितीने दिलेल्या चांदीच्या विटा प्रभू रामचंद्राच्या गर्भगृहात उपयोगी पडतील, असे प्रतिपादन श्री राम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज परमहंस यांनी केले. श्री रामनवमी शोभायात्रा समितीने राजराजेश्वर नगरीच्या नागरिकांच्या वतीने नऊ चांदीच्या विटा प्रभू रामचंद्राच्या मंदिर निर्माणसाठी दिल्यात.

 

हेही वाचा गोळीबाराने हादरले शहर; वाढदिवसाच्या दिवशीच घटला थरार, गोड्या झाडून लुटली रक्कम

नागपूर येथील महाराणा प्रताप चौक येथे आयोजित कार्यक्रमात या विटा सोपविण्यात आल्यात. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून विलास अनासने, ब्रिजमोहन चितलांगे, विजय कछवाह, विजय वर्णेकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले तर प्रास्ताविक अनिल मानधने यांनी केले. आभार गिरीराज तिवारी यांनी मानले. यावेळी नितीन जोशी, राम ठाकूर, अजय पांडे, शैलेश राठोड, प्रवीण मानकर, प्रमोद जावरकर, मोहन गुप्ता, शंकर खोवाल आदींसह रामभक्त्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

ऑगस्टमध्ये केला होता संकल्प
राम मंदिरासाठी चांदीच्या विटा देण्याचा सकंल्प श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आमदार गोवर्धन शर्मा यांनी ता.५ ऑगस्ट रोजी केला होता. विटा विधिवत पूजन करून राम मंदिर निर्माण कार्यात खारीचा वाटा उचलल्या बद्दल समितीचे कौतुक करण्यात आले. प्रत्येक भारतीय नागरीकांचा योगदान यामध्ये असावे यासाठी 14 जानेवारीपासून अभियानात सुद्धा सहभागी होण्याचे आवाहन गोविंद गिरी महाराज यांनी केले.

हेही वाचा गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

यांनी दिले योगदान
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने एक चांदीची वीट देण्यात आली. याशिवाय गोवर्धन शर्मा परिवार, मनोज खंडेलवाल, अश्विनी हातवळणे, अनुराग अगरवाल, रामभज गुप्ता परिवार, विलास अनासने, चेतन सुरेखा, श्रीमती कांतादेवी गोइंका, ब्रिजमोहन चितलांगे, पाठक परिवार यांच्यावतीने चांदीच्या विटा राम मंदिरासाठी देण्यात आल्यात. श्री गोविंद गिरी महाराज या चांदीच्या विटा श्रीराम जन्मभूमी न्यासचे सचिव चंपतराय यांच्याकडे सुपूर्त करणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image