तण नाशक फवारणी केल्यामुळे गहू करपला

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 5 January 2021

तालुक्यातील चोंढी येथील रमेश ताजने या शेतकऱ्यांनी सर्वे नं ३०/१ शेतातील गहू पिकावर तण नाशक फवारणी केल्यामुळे पाच एकरातील गहू जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

पातूर (जि.अकोला)  :  तालुक्यातील चोंढी येथील रमेश ताजने या शेतकऱ्यांनी सर्वे नं ३०/१ शेतातील गहू पिकावर तण नाशक फवारणी केल्यामुळे पाच एकरातील गहू जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

चार ते पाच दिवस आधी ताजने यांनी आपल्या शेतातील गहू पिकात तण निघाल्यामुळे आलेगाव येथील तायडे कृषी अग्रो सेवा केंद्रातून संबंधित कंपनीचे तण नाशक आणून शेतातील पिकावर फवारणी केली.

मात्र, दोन ते तीन दिवसामध्ये गहू पूर्ण जळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून घडलेली माहिती दिली परंतु, त्यांनी कोणत्याही प्रकारची दाखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाच एकर शेतातील गव्हाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी ताजने यांनी केली आहे.

सादर शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्याआधारे सबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याने शेतातील गव्हाची पाहणी करून त्यांना पुन्हा कंपनीकडून औषधी देण्यात आली आहे.
-मदन तायडे, तायडे कृषी सेवा केंद्र, आलेगाव.

(संपादन - विवेक मेतकर)

 

हेही वाचा -

पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!

उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News At Pathur, wheat was harvested due to spraying of herbicides