पाणी पळविण्याचा डाव उधळला, शिवसेना सदस्यांच्या तक्रारीवरून आदेश

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 7 January 2021

उन्हाळा तापायला अद्याप बराच वेळ असला तरी जिल्ह्यात सध्या अनेक कारणांनी पाण्याच्या प्रश्नावर राजकारण चांगलेच तापत आहे. आधी तेल्हारा तालुक्यातील वान धरणातील पाण्यावरून वाद झाला तर आता जिल्हा परिषद अध्यक्षांकडून भांबेरीला पाणी पळविण्याचा वाद उफाळून आला आहे.

अकोला :  उन्हाळा तापायला अद्याप बराच वेळ असला तरी जिल्ह्यात सध्या अनेक कारणांनी पाण्याच्या प्रश्नावर राजकारण चांगलेच तापत आहे. आधी तेल्हारा तालुक्यातील वान धरणातील पाण्यावरून वाद झाला तर आता जिल्हा परिषद अध्यक्षांकडून भांबेरीला पाणी पळविण्याचा वाद उफाळून आला आहे.

त्यात शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गट नेत्यांनी केलेल्या तक्रारीवरून भांबेरीला पाणी देण्याच आदेशच रद्द झाल्याने जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा - आमच्या हातात गुजरात द्या, आम्ही अहमदाबाद चे नाव बदलवून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो’

अकोला जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजने अंतर्गत असलेल्या गावांना ८ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थतीत जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी त्यांच्या भांबेरी गावाला देवरी फाटा येथून जोडून योजनेचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी योजनेतून पाणी पुरवठ्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे नाहरकत पत्र सुध्दा घेतले होते. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला

त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाबही विचारला होता. त्यांनी मजीप्राच्या निर्णयाविरुद्ध अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रारही केली. अधीक्षक अभियंता यांनी चौकशी करून भांबेरी गावाकरिता पाणी पुरवठ्याची परवानगी देणारा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी तोंडघशी पडले आहेत.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

...तर पाणींटचाईचा सामना
जिल्ह्यातील ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेत अतिरिक्त गाव जोडण्याचा जिल्हा परिषद अध्यक्षांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नानुसार भांबेरी गाव या योजनेत जोडण्यात आले असते तर ८४ गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले असते. आधीच आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असलेल्या या योजनेंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला असता, असे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी अधीक्षक अभियंत्याना दिलेल्या पत्रात म्हटले होते. त्यानुसार चौकशी होऊन पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करण्यात आला.

हेही वाचा - पतंग उडविण्यासाठी शेतात गेलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

भांबेरी प्रस्तावित योजनेत
भांबेरी या गावाला ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतून पाणी देण्यात येऊ नये अशी मागणी जि.प. सदस्य गोपाल दातकर यांनी केल्यानंतर मजीप्राच्या अधीक्षक अभियंत्यांनी अकोला येथील मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांना चौकशी करण्यासंदर्भात कळविले होते. त्यानुसार कार्यकारी अभियंता यांनी अधीक्षक अभियंता यांना पत्र देवून भांबेरी या गावाचा समावेश ८४ खेडी योजनेत केला तर इतरही गावांची मागणी होऊ शकते. तेव्हा तांत्रिकदृष्ट्या हा प्रस्ताव मान्य करणे शक्य नाही. शिवाय भांबेरी या गावाचा समावेश तेल्हारा तालुक्यातील वान धरणातून प्रस्तावित ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेत करण्यात आला असल्याने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेला आदेश अधीक्षक अभियंता यांनी रद्द केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News The plot to steal water was foiled, an order was issued on the complaint of Shiv Sena members