
रेल्वे प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या तसेच महाराष्ट्राला मध्यप्रदेशसोबत आणि दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून सिकंदराबाद जयपूर मीटरगेज रेल्वेमार्ग ओळखला जातो.
हिवरखेड (जि.अकोला) : रेल्वे प्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या तसेच महाराष्ट्राला मध्यप्रदेशसोबत आणि दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून सिकंदराबाद जयपूर मीटरगेज रेल्वेमार्ग ओळखला जातो.
या मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये कन्वर्जन करण्याचे काम अकोला ते अकोट पूर्ण झाले आहे. अकोट ते अमला खुर्द हा टप्पा मेळघाटमधून गेलेला असल्याने हा मार्ग मेळघाट मधूनच न्यावा की मेळघाट ऐवजी बाहेरून न्यावा याबाबत दोन मतप्रवाह असून, हा विषय अत्यंत किचकट झाला आहे.
हेही वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे, आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार
अकोट ते आमलाखुर्द या मार्गाचे नवीन काम सुरू करण्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश निघालेले नाहित. परंतु सातपुडा पर्वतातून जाणाऱ्या या मार्गावरील प्रसिद्ध मराठीतल्या ‘चार चा आकडा’ आणि धूळघाट रेल्वे स्टेशन दरम्यानचा दरगाह जवळच्या नदीवरील अत्यंत मोठा पूल अखेर जमिनदोस्त करण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियावर सदर फुल पडण्याचे छायाचित्रे आणि त्याच्यासोबतचा मजकूर व्हायरल होत आहे. त्यामध्ये उल्लेख आहे की खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नांना यश, धुलघाट रेल्वे येथे जुने रेल्वे ब्रिज पाडण्याचे काम चालू झालेले आहे लवकरच रेल्वेचे नवीन काम चालू होईल.
या मॅसेजमुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढला असून नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश नसताना किंवा टेंडर निघाले नसताना हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार नाही काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक
सुप्रीम कोर्टाच्या सीईसी समितीने आधीच हा मार्ग आतून नेण्यास विरोध दर्शविलेला आहे. सोबतच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पंतप्रधानांकडे रेल्वेमार्ग बाहेरून नेण्याची विनंती केली आहे. मेळघाट मधील अनेक महत्वपूर्ण असणाऱ्या परवानग्या सुद्धा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ह्या मार्गाचे भविष्य सध्यातरी अधांतरीच लटकलेले आहे.
नवीन काम सुरु होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
परंतु जुन्या लाईनचे काम उखडून टाकण्यात लोकांनी नाराजी व्यक्त करू नये म्हणून नवीन काम सुरू होण्याचे लॉलीपॉप देऊन काही लोकप्रतिनिधींचा गवगवा करण्यासाठी सोशल मीडियातून मॅसेज व्हायरल होत आहेत. जुने इन्फ्रास्ट्रक्चर उखडून काढल्याने अकोट ते तुकाईथड पर्यंत मेळघाट मधून मीटर गेज रेल्वेसेवा पूर्ववत बहाल करण्याच्या मागणीला खो देण्यात आला आहे. याचा अर्थ ना रहेगा बास न बजेगी बासुरी चा हा एकूण प्रकार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी व्यक्त करीत आहेत. धूळघाट परिसरात नवीन मार्ग सुरू होण्याबाबत फक्त आश्वासनांचे चॉकलेट दिला जात असून जुना रेल्वे पूल तोडल्या गेला आहे परंतु याबाबत आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही असे म्हणत धुळघाटचे सरपंच राम भिलावेकर यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
खासदार नवनीत राणा यांनी संसदेत मागणी केल्यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा मार्ग मेळघाट मधूनच जाणार असून, लवकरच काम सुरू होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
- रवी राणा, आमदार
जुन्या मार्गातील साहित्य काढून नेण्याची परवानगी वनविभागाने दिली आहे. परंतु रेल्वेला ब्रॉड गेजचे नवीन काम सुरू करू देण्याबाबत वरिष्ठांकडून कोणतेही आदेश नाहीत.
- इंद्रजित निकम, एसीएफ, वनविभाग, परतवाडा
अकोट ते आम्ला खुर्द रेल्वेमार्ग मेळघाट मधून जाणार की बाहेरून जाणार हेच अजून निश्चित नसल्याने रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
राजेश शिंदे, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड.
(संपादन - विवेक मेतकर)