esakal | शेतकरी नेते राकेश टीकैत शनिवारी अकोल्यात, संयुक्त किसान मोर्चा फुंकणार आंदोलनाचे बिगुल
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Rakesh Tikait Samyukta Kisan Morcha Andolan

संयुक्त किसान मोर्चा देशातील विविध भागात जाऊन किसान महापंचायतद्वारे कायद्याचा विरोध गाव पातळीपर्यंत पोहचविण्याकरिता प्रयत्नरत आहे. या प्रक्रियेतला भाग म्हणून, संयुक्त किसान मोर्चाची ‘किसान कैफीयत’ ही महापंचायत २० फेब्रुवारी रोजी अकोल्यात शेतकरी नेते राकेश टीकैत व युद्धविर सिंह यांच्या उपस्थित होत आहे.

शेतकरी नेते राकेश टीकैत शनिवारी अकोल्यात, संयुक्त किसान मोर्चा फुंकणार आंदोलनाचे बिगुल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : संयुक्त किसान मोर्चा देशातील विविध भागात जाऊन किसान महापंचायतद्वारे कायद्याचा विरोध गाव पातळीपर्यंत पोहचविण्याकरिता प्रयत्नरत आहे. या प्रक्रियेतला भाग म्हणून, संयुक्त किसान मोर्चाची ‘किसान कैफीयत’ ही महापंचायत २० फेब्रुवारी रोजी अकोल्यात शेतकरी नेते राकेश टीकैत व युद्धविर सिंह यांच्या उपस्थित होत आहे.

शेतकरी जागर मंचने या महापंचायते आयोजन केले असून, येथूनच संयुक्त किसान मोर्चा आंदोलनाचे बिगुल फुंकणार असल्याचे शेतकरी जागर मंचच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

शासकीय विश्राम गृह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी जागर मंचच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील ही पहिलीच किसान महापंचायत आहे. केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने शेतकरी विरोधी कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी समाजामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. दिल्लीच्या सिमेवर आंदोलन ही शेतकरी समाजासाठी एखादी दुसरी घटना नसून त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणूनच देहभान विसरून लाखो शेतकरी आंदोलनात ठिया देऊन बसले आहेत. राकेश टीकैत यांची अकोल्यातील सभा ही महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला नवी आयाम देणारी असेल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.


सभेत यांचा सहभाग
किसान कैफीयत महापंचायतीचे आयोजन अकोल्यातील खुले नाट्यगृह येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता करण्यात आले आहे. या सभेत स्वाभीमानी शेतकरी संघटना, किसान विकास मंच, कुणबी विकास मंडळ, नेहरू युवा परिवार, अमरावती विभागीय शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, देशमुख समाज मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघ व इतर अनेक संघटनांचा आयोजन व नियोजनात सक्रिय सहभाग राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

हेही वाचा - 

भिती वाढतेय; पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ९० नव्या रुग्णांची भर

तुम्हाला उद्योग करायचा आहे का? मिळणार आर्थिक बळ आणि ट्रेनिंगही

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

loading image
go to top