esakal | राशन दुकानदारावर ७५ हजारासाठी गुन्हा! वाचा काय आहे प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News- Ration shopkeeper charged for Rs 75,000

एका रास्त धान्य दुकानदारावर तेल्हारा तहसीलमधील कारकून रामेश्वर भोपळे यांनी ता. १७ एप्रिल २०२० रोजी रास्त धान्य दुकानदार छांगाणी यांच्या रास्त धान्य दुकानदारावर कारवाई केली होती.

राशन दुकानदारावर ७५ हजारासाठी गुन्हा! वाचा काय आहे प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला):   एका रास्त धान्य दुकानदारावर तेल्हारा तहसीलमधील कारकून रामेश्वर भोपळे यांनी ता. १७ एप्रिल २०२० रोजी रास्त धान्य दुकानदार छांगाणी यांच्या रास्त धान्य दुकानदारावर कारवाई केली होती.

ही कारवाई अंती गुन्हा दाखल न करण्यासाठी ७५ हजार रुपयांची मागणी केली असल्याचा गंभीर आरोप रास्त धान्य दुकानदार रमेश छांगानी यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्या यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.

हेही वाचा - ‘मुख्यमंत्री साहेब, पोरगी पाहून माझं लग्न करुन द्या’, वाशिमच्या युवकाचं थेट मुख्यमंत्र्यांना भन्नाट पत्र

कोरोना काळात ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांच्या ता. २ एप्रिल २०२० च्या आदेश अन्वये अंगठा देण्याचा अधिकार रास्त धान्य दुकानदारांना देण्यात आला होता. अशा परिस्थितीत तांत्रिक बिघाडामुळे रास्त धान्य वितरण करण्याची ऑनलाईन मशीन दोन दिवसांपासून बंद पडली होती. अशाही परिस्थितीत धान्य वितरण करण्यासाठी दीडशे ते दोनशे कार्डधारकांची लाईन, त्यात कोरोनासारखी संसर्गजन्य परिस्थिती असल्याने रास्त दुकानदार रमेश छांगानी यांनी रजिस्टर व लोकांच्या सह्या घेऊन कार्डवर नोंदी करून धान्यपुरवठा केला होत.

हेही वाचा - सख्खा भाऊ पक्का विरोधक, ग्रामपंचायतच्या निवडणूकीत लावली प्रतिष्ठा पणाला

गर्दीमुळे व कोरोना परिस्थितीमुळे वाटपाचे बिले लोकांना देता आली नाही. याच बाबीला हेरून तेल्हारा तहसीलमधील पुरवठा विभागाने रास्त धान्य दुकानदार रमेश छांगाणी यांच्यावर दुकानावर ता. १७ एप्रिल २०२० रोजी कारवाई केली. या कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी ७५ हजारांची मागणी केली असल्याचा गंभीर आरोप पुरवठा कारकून रामेश्वर भोपळे यांच्यावर दुकानदाराने केला आहे.

त्यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना दिलेल्या निवेदनात तत्कालीन तहसीलदार सुरळकर यांचा उल्लेख भ्रष्टाचारी म्हणून केला असून, पुरवठा कारकून रामेश्वर भोपळे यांना दुपारी ३ वाजेपर्यंत पैसे न दिल्याने त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा सुद्धा आरोप केला आहे.

हेही वाचा - ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’, कान्हेरीच्या विठ्ठलाने शेतीलाच केले ‘पंढरी’​

उडीद, ज्वारी, नाश्तासाठी काजूही मागणी
पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी पैसांची मागणी होत असून, माझ्या जवळून २० हजार, १० हजार व ५ हजार असे तीन वेळा पैसे घेतल्याचा आरोप छांगाणी यांनी केला आहे. उडीद, दादर ज्वारी, नाश्ता काजू किसमिस वेळोवेळी घेतले असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केला. प्रत्येक डीलर जवळून मासोळी खाण्यासाठी पैसा व इतर वस्तू घेतल्याचा सुद्धा आरोप त्यांनी पुरवठा विभागावर केला आहे. रामेश्वर भोपळे यांनी पुरवठा निरीक्षकांनी धान्य पास केलेले इंडेड फाडून टाकले असल्याचा सुद्धा आरोप केला आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदेची बियाणे वितरण योजनेत पाच हजार शेतकरी लाभापासून वंचितच!

पुरवठा निरीक्षकांवर रबरी स्टॅमचा आरोप
पुरवठा निरीक्षक व आयोग हे फक्त रबरी स्टॅम्प असल्याचा तसेच भोपळे यांना तहसीलदारांनी पूर्ण अधिकार दिले असल्याचा आरोप छांगाणी यांनी निवेदनातून केला आहे. ता.१७ एप्रिल २०२० रोजी झालेल्या कारवाईमध्ये रेकॉर्ड मधील आयओ यांच्या अहवालाप्रमाणे एक क्विंटल ९६ किलो धान्य कमी आढळले होते. ते धान्यसुद्धा मला गोदामपालकडून घेणे होते. त्यामुळे मी कोणताही गैरप्रकार केला नसल्याचे सिद्ध होत असल्याचे रास्त धान्य दुकानदार यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. यासोबतच दुकान क्रमांक ५ पुन्हा जोडून देण्याकरिता ५० हजार रुपयाची मागणी केली असल्याचा आरोप रास्त धान्य दुकानदार रमेश छांगाणी यांच्याकडून करण्यात आला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)