शाळा बंद मात्र, कोचिंग क्लासेसचा धूमधडाका सुरू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू करणार आहेत

मालेगाव (जि.वाशीम) : पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा हे सत्र सुरू झाले तेव्हापासून बंद आहेत. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे शासन शाळा सुरू करणार आहेत

मात्र, अजूनही अनेक शिक्षक व काही पालक शाळा सुरू करण्याला विरोध करीत आहेत. शाळा बंद असल्या तरी, कोचिंग क्लासेस मात्र, बऱ्याच दिवसापासून धूमधडाक्यात सुरू आहेत. तेव्हा कोचिंग क्लासेसच्या मुलांना कोरोना होत नाही का ? असा प्रश्न आता सुज्ञ लोकातून केला जात आहे.

हेही वाचा - नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं

जे पालक आणि शिक्षक म्हणतात शाळा सुरू नका त्यांची मुले कोचिंग क्लासेसला जात असल्याचे पाहून हे लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. आता कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे.

हेही वाचा - आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!

त्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र, अजूनही काही पालक व अनेक शिक्षक शाळा सुरू करण्याला विरोध करीत आहेत मात्र, गत दोन महिन्यांपासून पहिली ते आठवीपर्यंतचे कोचिंग क्लासेसचे वर्ग धडाक्यात सुरू आहेत.

तेव्हा कोचिंग क्लासेसच्या मुलांना कोरोना होत नाही का ? असा प्रश्न सूज्ञ लोकांतून केला जात आहे. कोचिंग क्लासेसच्या वर्गांना लहान मुलांच्या आई स्वतः घेऊन जातात दिसत आहेत. हा विरोधाभास पाहून सुज्ञ लोक संभ्रमात पडत आहेत.

हेही वाचा - शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर

कोरोनाचा पहिला रुग्ण जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सापडला असला तरी, आता तालुक्यात कोरोना आटोक्यात आहे. लोक आता बिनधास्तपणे तोंडाला मास्क न लावता सर्रास बाजार इतर व्यवहार करताना दिसत आहेत. आता, नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती संपली आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्यातही घट झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा!, हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय

दररोज कोचिंग क्लासेसच्या प्रवेशासाठी जाहिराती
खासगी कोचिंग क्लासेसच्या प्रवेशासाठी वृत्तपत्रांमध्ये नियमीत जाहिराती पत्रके घरोघरी येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पालक शाळा आणि कोचिंग क्लासच्या बद्दल संभ्रमात पडत आहेत. शाळा अजूनही सुरू करू नये असे, मोजकेच पालक आणि जास्त शिक्षक लोक बोलत आहेत. तेव्हा शासनाने लवकरात लवकर शाळा सुरू कराव्यात मात्र, शाळा सुरू करताना सुरुवातीला दुपारपर्यंत भरवाव्यात अशीही सूचना काही पालक करीत आहेत.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू ॲक्शन मोडवर, १० वैद्यकीय अधिकारी; ४५ आरोग्य सेवकांवर केली निलंबनाची कारवाई

शालेय मुले शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते घरी बसून कंटाळले आहेत. तेव्हा शाळा सुरू कराव्यात अशी मागणी सुज्ञ पालकातून केला जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News School closed, coaching classes in full swing, parents still confused