सत्र संपले शिष्यवृत्ती रखडलेलीच!, दुसऱ्या हप्त्याच्या शिष्यवृत्तीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

Akola Marathi News Session ends Scholarship stalled !, Students await second installment scholarship
Akola Marathi News Session ends Scholarship stalled !, Students await second installment scholarship

अकाेला : सन् २०१८-१९ चे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर सुद्धा महाविद्यालयांच्या वेळकाढूपणामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्तीपासून (दुसरा हप्ता) वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अर्जातील त्रुटी, विद्यालय-महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा दावा समाज कल्याण विभाग करत आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मात्र शिष्यवृत्ती न मिळाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यालय व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एससी, व्हिजेएनटी, ओबीसी, एसबीसी व मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.

हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री

शैक्षणिक सत्र २०१८-१९ साठी सुद्धा जिल्ह्यातील नव्याने प्रवेशित व रिनीव्हल विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व फ्री-शिपसाठी अर्ज केले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला असला तरी शैक्षणिक सत्र संपल्यानंतर सुद्धा सन् २०१८-१९ वर्षाच्या विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थ्यांना फ्री-शिपच्या रक्कमेची सुद्धा प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव आहे. संबंधित विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने त्यांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

२०१८-१९ची रखडलेली शिष्यवृत्ती (विद्यार्थी संख्या)

  •  ओबीसी (भारत सरकार) - ८३७
  •  एसबीसी (भारत सरकार) - ३९
  •  व्हीजेएनटी (भारत सरकार) - १९०
  •  राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती - ४६
  • ओबीसी फ्रीशिप - १२०
  • एसबीसी फ्रीशिप - ०७
  • व्हीजेएनटी (फ्रीशिप) - ६७
  • एससी (भारत सरकार) - ५४०
  • राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती (एससी) - ७७
  • मागासवर्गीत विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व परीक्षा शुल्क - २७
  • अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती - ०२
  • व्यावसायिक पाठ्यक्रम विद्यावेतन योजना - ०१

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

महाविद्यालय स्तराव अर्जांना ग्रहण!
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज सर्वात आधी महाविद्यालय स्तरावर मंजुरीसाठी पोहचतात. परंतु महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहत असल्याने समाज कल्याण विभागाला अर्जावर पुढील कार्यवाही करता येत नाही. सन् २०१८-१९ प्रमाणेच सन् २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठीचे अर्ज सुद्धा महाविद्यालयीन स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामध्ये ४६४ अर्ज अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे तर ५२७ अर्ज ओबीसी, एसबीसी, व्हिजे-एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com