दोन महिलांसह सहा जण करीत होते लग्न जुळवण्याच्या नावाखाली फसवणूक

Akola Marathi News Six people, including two women, were cheating in the name of matching marriage
Akola Marathi News Six people, including two women, were cheating in the name of matching marriage

अकोला : लग्नाकरिता मुलगी दाखवून बाहेर जिल्ह्यांतील लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक करणारी टोळी डाबकी रोड पोलिसांनी शनिवारी गजाआड केली.
डाबकी रोड पोलिस स्टेशन येथे २० जानेवारी रोजी फिर्यादी राहुल विजय पाटील (वय २८) या नंदुरबार जिल्ह्यातील वडाळी येथे राहणाऱ्या तरूणाने तक्रार दिली.

तक्रारीनुसार १० डिसेंबर२०२० रोजी लग्नासाठी त्यांना आरोपी सुदाम तुळशीराम करवते (रा.पांघरी नवघरे जि.वाशीम) याने पातुर बस स्टॅन्डवर बोलावून घेतले. अकोला येथे लग्नाची मुलगी दाखवून लग्न करून देतो असे म्हणून फिर्यादी व त्याचे नातेवाईकांना अन्नपूर्णा माता मंदीर जवळ, डाबकी रोड, अकोला येथे बोलवून तेथे मनिषा पाटील नावाची मुलगी दाखवली.

ती मुलगी फिर्यादी यास पसंत आल्याने लग्न करून देण्याकरिता १ लाख ६० हकजार रुपयांची बोलणी करून चांदुर फाटा जवळ, पातुर रोड, येथील लक्ष्मी माता मंदीरामध्ये दाखविलेल्या मुलीसोबत लग्न लावून देवून त्याबदल्यात १ लाख ३० हजार रुपये फिर्यादी व त्याचे नातेवाईकाकडून आरोपी सुदाम करवते व त्याचा साथीदारांनी घेतले.

लग्नाची मुलगी मनिषा पाटील फिर्यादी व त्याचे नातेवाईकासोबत पाठवून दिले. फिर्यादीची बोलेरो गाडी प्रभात किड्स जवळ, पातुर रोड येथे आल्यानंतर अनोळखी लोकांनी गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून फिर्यादी व त्याचे नातेवाईकांसोबत वाद करून लग्न केलेली मुलगी नमुद अनोळखी लोकांसोबत मोटारसायकलवर बसून निघून गेली.

यातील नमुद आरोपीनी फिर्यादीची फसवणूक केल्याचा जबानी रिपोर्ट दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. तपासात २२ जानेवारी २०२१ रोजी आरोपी सुदाम तुळशीराम करवते हा पंचायत समीती अकोला जवळ असल्याची माहिती मिळाल्यावरून आरोपीस सदर ठिकाणावरून ताब्यात घेतले. त्याचे सोबत इतर ४ ते ५ इसमांना ताब्यात घेऊन पो.स्टे.ला आणुन चौकशी केली.

यातील आरोपी सुदाम करवते हा त्याचे मूळ नाव गुलाब नारायण ठाकरे असून तो व त्याचे साथीदार हे करमुड ता.चाळीसगाव जि.जळगाव येथील अतुल ज्ञानेश्वर सोनवणे (पाटील) या वर मुलाचे एका मुलीसोबत लग्नाचे आमीष दाखवून १ लाख ५० हजार रुपयांची मागणी करून आरोपीनी नगदी २० हजार रुपये घेतले.

आरोपी यांनी स्वताचे बनावट आधार कार्ड बनवून फिर्यादीला खोटे, नाव, पत्ता तो खरा असल्याचे भासवून फसवणूक केली. अतुल ज्ञानेश्वर सोनवणे यांनी २३ जानेवारी २०२१ रोजी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. या तपासामध्ये आरोपीसोबत शंकर बाळू सोळंके (वय १८ रा.सातमैल, वाशीम बायपास रोड), संतोष उर्फ गोंड सिताराम गुडधे (वय.५३ रा.आगिखेड, ता.पातुर), हरसिंग ओंकार सोळंके (वय २८ रा.चांदुर) अधिक दोन महिला पैकी एक महीला जळगाव खान्देश व एक महीला अकोला येथील आरोपी यांना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पो.नि.नाफडे पो.स्टे.डाबकी रोड अकोला हे करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com