विचित्र अपघात; नॕशनल हायवेवर दोन ट्रक एकमेकांवर धडकले

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 5 January 2021

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर येथील ५ किलोमिटर अंतरावरील अनभोऱ्याजवळ दोन ट्रक एकमेकांवर समोरासमोर धडकल्याने काल रात्री १० च्या दरम्यान झालेल्या  अपघातात एक जण ठार झाला. 
 

मूर्तिजापूर (जि.अकोला)   : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर येथील ५ किलोमिटर अंतरावरील अनभोऱ्याजवळ दोन ट्रक एकमेकांवर समोरासमोर धडकल्याने काल रात्री १० च्या दरम्यान झालेल्या  अपघातात एक जण ठार झाला. 
       

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती कडून अकोला कडे जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एम.एच.१२ एल.टी.७७३६) व विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रक (क्रमांक एम.एच.३२ एजे३३५५) एकमेकांवर धडकले. या अपघातात आयशर चालक केबिनमध्ये फसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर सदर आयशर ट्रकने पेट घेतला,

मात्र ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दोन तासांच्या परिश्रमानंतर केबिन तोडून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील काही तासासाठी विस्कटलेली वाहतूक ग्रामीण पोलीसांनी सुरळीत केली.

एमएच ३२ एजे ३३५५ क्रमांकाच्या ट्रक चालकाविरुद्ध भरधाव व निष्काळजी वाहन चालविल्यामुळे भादंविच्या २७९, ३०४ कलमांतर्गत पोलीसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनात  हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे व पोलीस शिपाई अनिल अहेरवाल करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

हेही वाचा - 

 

वातावरणात बदललय, आर्द्रतेचाही वाढला टक्का

उमेदवार मुख्यध्यापकांना देत आहेत धमकी - विनोद नरवाडे 

तण नाशक फवारणी केल्यामुळे गहू करपला

शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Strange accident; Two trucks collided on the National Highway